शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचा नाशकात वर्धापनदिन सोहळा

By admin | Updated: September 16, 2016 23:57 IST

साठावा वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांसह आठवलेंची उपस्थिती

 नाशिक : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा ६०वा वर्धापन दिन सोहळा नाशिकला दि. ३ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून, यावेळी केंद्रीय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा नागरी सत्कार आयोजित केल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सेना-भाजपाचे अनेक मंत्रिगण व लोकप्रतिनिधी हजेरी लावणार असल्याने राजकीयदृष्ट्याही या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. रिपाइं येत्या ३ आॅक्टोबरला ६०व्या वर्षात पदार्पण करत आहे. नाशिक ही दलित चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक भूमी असल्याने सदर वर्धापन दिन सोहळा नाशिकला साजरा करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती प्रकाश लोंढे यांनी दिली. ३ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह सेना-भाजपाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दलित चळवळीत योगदान देणाऱ्या ५९ व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असून, रामदास आठवले यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रकाश लोंढे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर रामदास आठवले यांचे पहिल्यांदाच नाशिकला आगमन होत असल्याने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली जात आहे. याचबरोबर सद्यस्थितीत सेना-भाजपात वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठीही या कार्यक्रमाकडे पाहिले जात असून, त्यासाठीच आठवले यांनी युतीतील नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दि. ७ आॅक्टोबरला शिर्डी येथे रिपाइंच्या वतीने दलित-मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीही महत्त्वपूर्ण चर्चा नाशिकला होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)