वरखेडा : तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतने भास्करराव पेरे पाटील यांचे आदर्शगाव पाटोदा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचेगाव राळेगणसिद्धी व पोपटराव पवार यांचे गाव हिरवेबाजार या तीनही गावांना व बचतगटांचे प्रतिनिधींनी भेट दिली. पदाधिकाºयांनी प्रथमत: पाटोदा गावाला भेट दिली. यावेळी पाटोदा सरपंच पेरे पाटील यांचा तळेगाव दिंडोरी गावचे उपसरपंच गोकुळ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चकोर, चंद्रभागाबाई भोई, माधव चारोस्कर, अजय चारोस्कर, पुष्पा पालवे, सिंधू जाधव, माजी सरपंच उमाकांत चारोस्कर, प्रजाकसत्ताक स्वयंसहायता बचतगटाचे राजेंद्र गोसावी, पुंजाराम पालवे, श्रीराम स्वयंसहायता बचतगटाचे ज्ञानेश्वर चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद दिवे आदींच्या हस्ते ग्रामगीता पुस्तक भेट देऊन सत्कार केला. पाटोदा येथे वाळलेला पालापाचोळा, भाज्यांची देठे, प्लॅस्टिक पिशव्या वेगळ्या करून यापासून कम्पोस्ट खत तयार केले जाते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने तेथील शेतकरी कंपोस्ट खतांचा वापर करतात.पदाधिकाºयांनी जाणले.पाटोदा गावातील पाहणीदरम्यान अंगणवाडीत खिचडी शिजवण्यासाठी आधुनिक सौरऊर्जा यंत्र, गावातील संपूर्ण रस्ते पेव्हर ब्लॉकने सुसज्ज अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रार्थना घेतली जाते. गावाजवळच एमआयडीसी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी चार टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील ग्रामस्थांना स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचे पाण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी व तेही घरपोच देण्यात येते. गावात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटर बसविण्यात आले आहे.
पदाधिकाºयांची राळेगण, पाटोद्याला भेट तळेगाव दिंडोरी : अण्णा हजारे यांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:22 IST