शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: March 8, 2017 01:31 IST

येवला : पाणी न मिळाल्याने या वितरिकांवरील लाभधारक शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी ३ वाजता अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

येवला : तालुक्यातील पालखेड पाटबंधारे डावा कालवा विभागाच्या वितरीकांवरील एरंडगाव, धुळगाव परिसरातील लाभधारक पाणी वापर सहकारी संस्थांना त्यांच्या कोट्याचे पाणी न मिळाल्याने या वितरिकांवरील लाभधारक शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी ३ वाजता अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी तत्काळ अटकाव केल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा संबधितांना देऊनही एकही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता.एरंडगाव, धुळगाव येथील सिद्धेश्वर व दहेगाव शिवारातील सप्तशृंगी पाणीवापर संस्थेला आवर्तनाचे पाणीच दिले नाही. जे पाणी दिले ते फक्त धनदांडग्यांचे शेततळे भरून देण्यासाठी दिले. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे नाही अशा शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. अचानक तुमचा कोटा संपला, असे जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता जी. आर. काकुळते यांनी जाहीर केल्यानंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी न मिळाल्यास वितरिका क्र मांक ३३ च्या गेटवरच आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित अधिकारी व तालुका पोलिसांना पत्राद्वारे मंगळवारी दुपारी १२ वाजता दिला होता. दहेगाव, एरंडगाव व धुळगाव येथील शेकडो आंदोलक वितरिका क्र मांक ३३ च्या गेटवर दुपारी ३ वाजता एकत्र आले. मात्र कालव्याचे पाणी पालखेड येथूनच बंद झाल्याने व शिल्लक पाणी पाटोदा येथील साठवण तलावात वळविल्याने कालवाच कोरडा झाल्याचे पाहून आंदोलनकर्ते उग्र झाले. सिताराम गायकवाड, बाळू शिंदे, बाळू शेळके, वसंत गायकवाड यांनी सोबत डब्यामध्ये आनलेले रॉकेल अंगावर ओतुन घेतआत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आप्पासाहेब गायकवाड व इतर उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या शेतकऱ्यांच्या हातातील रॉकेलचा डबा हिसकावत त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले. तहसील , पोलीस व जलिसंचन विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलाच नाही.  या आंदोलनात बाळासाहेब साताळकर, अप्पासाहेब गायकवाड, सिताराम गायकवाड, सचिन दोंडे, अनिल साताळकर, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड आदि सहभागी झाले होते. वितरिका क्रमांक ३४ वरीलही पाणी वापर सह. संस्थांना पाणी न देताच अधिकाऱ्यांनी संस्थेच्या पाणी कोटा संपला असे जाहीर केल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. (वार्ताहर)