शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्याने तोडली डाळिंबबाग

By admin | Updated: May 29, 2017 00:16 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली. दीक्षी येथील हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून, त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली.  सन २०१३ पासून शेतीत नवीन काही तरी करावे या उद्देशाने डाळिंबबाग लावली. सुरुवातीला तीन एकर क्षेत्रात डाळिंब लावले. शासनाच्या फळ रोपवाटिकेतून भगवा जातीची रोपे आणली; मात्र रोपे अत्यंत कमी दर्जाची व भेसळयुक्त निघाल्याने एक वर्ष वाया गेले. या भागात दहा वर्षांपासून कृषी सहायक नसल्याने स्वखर्चाने शेततळे तयार केले. यासाठी वीस लाख रु पये खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे  उभारून डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र उत्पादनावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने चौधरी चिंतातुर होते. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेल्या मालाच्या किमतीत बराच मोठा फरक होता. आजपर्यंत उत्पादनावर आधारित भाव तर मिळालाच नाही मात्र उत्पादन खर्च दरवर्षी वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेल्या शेती व्यवसायाला वैतागून चौधरी यांनी संपात सहभागी होण्याचे ठरवले. राज्यभरातील शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संप काळात फक्त स्वत:पुरतेच पिकवायचे म्हणून हेमंत चौधरी यांनी तीन एकर डाळिंबबाग तोडण्याचा निर्णय घेतला.