शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष नगरसेवकाच्या प्रवेशावरून गदारोळ

By admin | Updated: January 30, 2017 00:18 IST

शिवसेना कार्यालय : प्रभाग तीसमधील इच्छुकांचा आक्षेप; तिकीट कापायची भीती

नाशिक : शहरातील एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेचा उंबरा चढण्याची तयारी केली असून, काही वरिष्ठ नेत्यांकडून त्या नगरसेवकाची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची कुणकुण लागल्यामुळे शिवसेनेच्या एका जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्याच्या गटातील इच्छुक उमेदवारांनी आक्षेप घेतला. रविवारी या इच्छुक कार्यकर्त्यांनी आमदार अजय चौधरी यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली. दरम्यान, इच्छुकांनी यावेळी गोंधळ घातल्याने तिकीट कापाकापीचे नवे ‘वादळ’ उठले आहे.रविवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड आदि उपस्थित होते. इच्छुकांच्या मुलाखती हे सर्व पदाधिकारी घेत असताना दुपारच्या सुमारास प्रभाग तीस व प्रभाग तेरामधील काही कार्यकर्ते इच्छुकांसमवेत शिवसेना कार्यालयात आले. त्यांनी संबंधित अपक्ष नगरसेवकाला शिवसेनेमध्ये घेऊन यांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून गोंधळ घातला. अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेचे इच्छुक उमदेवार म्हणून प्रभागात प्रचारालाही सुरुवात केली असून, शिवसेनेत प्रवेश करून सदर नगरसेवक आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागत असल्याची जोरदार चर्चा कार्यालयाच्या आवारात होती. सदर अपक्ष नगरसेवकाला काही वरिष्ठ नेते छुपा पाठिंबा देत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)