शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचवटी’ची जुनी कट बोगी काढल्याने पासधारकांत संताप

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

मनमानी : जुनीच बोगी पूर्ववत जोडण्याची मागणी

इगतपुरी : मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची शेवटची कट बोगी काढून त्याजागी प्रवाशांना बसण्यासाठी कमी आसन क्षमतेची बोगी जोडण्यात आल्याने प्रवाशांचे व पासधारकांचे हाल होत असून, नवीन बोगी बसविण्यात यावी, अशी मागणी पंचवटी रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.मुंबईत नोकरीसाठी जाणारे चाकरमाने, उद्योगधंद्यानिमित्त जाणारे व्यावसायिक व प्रवासी यांची हक्काची म्हटली जाणारी मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस या गाडीतील शेवटची ६० आसनक्षमता असलेली बोगी गेल्या दोन महिन्यांपासून काढण्यात आली असून, त्याजागी २० प्रवासी आसनक्षमता असलेली बोगी जोडण्यात आली आहे. यामुळे शेवटच्या बोगीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहेत.शेवटच्या कट बोगीत यापूर्वी ६० आसनक्षमता असलेली मोठी बोगी होती. त्याच बोगीला अपंग व गार्ड बोगी जोडलेली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारण दाखवीत ती बोगी मेंटेनन्ससाठी बदलविली असून, त्याजागी २० प्रवासी असलेली छोटी बोगी व त्याला जोडून सामान वाहतुकीच्या दोन लगेच बोग्या व गार्ड बोगी अशी कट बोगी दिली आहे. दिवसेंदिवस पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवासीसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने जुनी बोगी काढल्याने पासधारक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पंचवटी एक्स्प्रेसमधील समोरासमोर आसन असलेल्या ५ ते ६ बोग्या काढण्यात आल्या असून, त्याजागी एका बाजूला तोंड असलेली आसनव्यवस्था असलेल्या बोग्या बसविण्यात आल्या आहेत.नाशिक-मुंबई प्रवास जवळपास तीन ते चार तासांचा असून, या नवीन बोगीतील आसनव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या चुकीची असून, दररोज प्रवास करणाऱ्या अनेक पासधारकांना पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्र ार केली आहे.