शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवदूत बनून वाचविले दोघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:37 IST

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणे भगूरचे समाजसेवक सुधाकर ताजनपुरे यांनी देवदूताप्रमाणे दोघा पती-पत्नीचे विजेच्या धक्क्यातून प्राण वाचविले.

भगूर : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणे भगूरचे समाजसेवक सुधाकर ताजनपुरे यांनी देवदूताप्रमाणे दोघा पती-पत्नीचे विजेच्या धक्क्यातून प्राण वाचविले.  भगूर कदम वाडा येथे भरत कन्हय्यालाल मंत्री (५३) हे पत्नी सविता (४९) हिच्यासह राहतात. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता भरत मंत्री यांनी नळाला पाणी आल्याने विद्युत मोटर सुरू करीत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंतींना ओलावा येऊन त्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने मंत्री यांना विजेचा धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करताच, त्यांच्या पत्नी घरातून पळत आल्या आणि त्यांनी भरत यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करताच, त्यांनादेखील विजेचा धक्का बसून त्याही चिकटल्या. दोघांनीही आरडाओरड केल्याने त्यांच्या शेजारीच राहणारे संरक्षण खात्यातील सेवानिवृत वायरमन सुधाकर गणपत ताजनपुरे धावतच मंत्री यांच्या घरात शिरले व क्षणाचीही उसंत न घेता, मंत्री यांची पॅँट धरून त्यांना ओढत कोरड्या जागेवर आणले. तोपर्यंत दोघे पती-पत्नी बेशुद्ध पडले होते. ताजनपुरे यांनी दोघांवर प्रथमोपचार केल्याने त्यांनी त्याला प्रतिसाद दिल्यावर तत्काळ दोघांना देवळाली कॅम्प कॅन्टोमेंन्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.  ताजनपुरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने दोघा पती-पत्नीला जीवदान दिल्याबद्दल जयशिव क्रांती मित्रमंडळाने उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे यांच्या हस्ते ताजनपुरे यांचा सत्कार केला. ताजनपुरे हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असून, त्यांची समाजसेवक म्हणून ओळख आहे.  घराच्या भिंतींना ओलावा येऊन त्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने मंत्री दाम्पत्यांंना विजेचा धक्का बसला. सुदैवाने ताजनपुरे मदतीला धावले आणि दोघांचे प्राण वाचले.

टॅग्स :electricityवीज