शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...अन त्या जखमीचे वाचले प्राण,डॉक्टर आणि पोलिसांनी घडविले माणूसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:51 IST

प्राथमिक उपचार किट काढून रक्तबंबाळ झालेल्या एका जखमीला मांडीवर घेऊन कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने प्राणवायू दिला

ठळक मुद्देप्राथमिक उपचार किट काढून रक्तबंबाळ झालेल्या एका जखमीला मांडीवर घेऊन कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने प्राणवायू दिलाडॉक्टरांनी वेळीच उपचार नसता केला तर रक्त फुप्फुसात जाऊन तो रूग्ण दगावण्याची शक्यता

नाशिक : वेळ रात्री पावणे अकरा वाजता... ठिकाण मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफली परिसर...पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर हे पोलिस कर्मचाºयांसह अमृतधाम परिसरात गस्त घालत असताना चौफलीजवळ दोन दुचाकी वाहने समोरासमोर धडकली. दोन्ही दुचाकीवरील तीन ते चार जण रस्त्यावर पडले. त्याच दरम्यान रस्त्याने जाणाºया डॉक्टरांनी तत्परता दाखवित आपल्याकडे असलेले प्राथमिक उपचार किट काढून रक्तबंबाळ झालेल्या एका जखमीला मांडीवर घेऊन कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने प्राणवायू दिला. तब्बल पंधरा ते वीस मिनिटांनी रूग्णवाहिका दाखल झाल्यानंतर त्या जखमींना पंचवटी पोलिसांनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून अपघातातील जखमींना तत्काळ मदत करून माणूसकीचे दर्शन घडविले.ऐरवी अपघात म्हटला तर रस्त्याने जाणारे नागरीक अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यापेक्षा त्या जखमींचे मोबाईल मध्ये फोटोसेशन करून व चित्रण करून त्या क्लिप, फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात धन्यता मानतात. मात्र जणू देवदूताच्या रूपात आलेल्या पोलीस व डॉक्टर यांनी जखमींचे प्राण वाचवून मनुष्याचा जीव किती महत्वाचा आहे हे पटवून दिले.हिरावाडीतील अयोध्यानगरीतील युवक आई वडीलांना घेण्यासाठी दुचाकीवरून अमृतधाम चौफुलीवर येत असतांनाच समोरासमोर दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. त्याच दरम्यान पोलीस गस्तीवर असलेल्या पोलिसांना अपघात झाल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बर्डेकर यांनी धाव घेत पोलिस कर्मचाºयांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या जखमींना रूग्णालयात हलविले. त्यातील एक जखमी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. रूग्णवाहिकेला माहिती कळविली आणि योगायोग म्हणा त्याच रस्त्याने कळवण येथिल डॉक्टर सुहास कोटकर हे चारचाकीतून जात होते. अपघात झाल्याने विव्हळणाºया जखमीस पाहून त्यांनी तत्काळ चारचाकी थांबविली. आपल्याजवळ असलेल्या कृत्रिम श्वासोश्वास यंत्राने त्या जखमीवर उपचार सुरू केले. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे उपचार सुरू होते. अखेर रूग्णवाहिका दाखल झाल्यानंतर त्यास उपचारासाठी रूग्णालयात हलविले. डॉक्टरांनी वेळीच उपचार नसता केला तर रक्त फुप्फुसात जाऊन तो रूग्ण दगावण्याची शक्यता होती.