शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अन् पोलिसांनी ठोकल्या ‘त्यांना’ लग्नाच्या बेड्या

By admin | Updated: May 22, 2017 02:10 IST

सटाणा : आठ दहा वर्षांपूर्वी ते दोन्ही प्रेमात पडले.दोन्ही सरकारी नोकरीला लागल्याने दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : आठ दहा वर्षांपूर्वी ते दोन्ही प्रेमात पडले. कालांतराने ती जिल्हा परिषद शिक्षिका झाली आणि तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस.दोन्ही सरकारी नोकरीला लागल्याने दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मात्र प्रियकर व प्रेयसी भिन्न समाजाचे असल्याने दोन्ही कुटुंबांकडून कडाडून विरोध झाला. दरम्यान दोघांसमोर आभाळाएवढ संकट आलं. प्रेयसीला कर्करोग झाल्याचं त्याला समजलं. ती या आजारातून बरी व्हावी म्हणून अखेरपर्यंत तो लढत राहिला.अखेर डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे तिचा आजार बरा झाला. आणि पोलिसांनीच या दोघाच्या लग्नाच्या गाठी जुळवून आणल्या. विनवणी करूनही जातीपातीच्या बंधनात बुडालेल्या सागरच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने पोलीस कर्मचार्यांचे कुटुंब त्याचे कुटुंब मानून २१ मे रोजी थाटात लग्न करण्याचा निर्णय सागरने घेतला. पोलीस वसाहतीत सागरच्या लग्नाची तयारी सुरु झाली. शनिवारी पार पडलेल्या सागरच्या मांडवात सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी त्याला हळद लावली. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे मोठ्या थाटात पार पडलेल्या या आंतरजातीय विवाहाला सागरचे कोणतेही नातेवाईक उपस्थित नव्हते. मात्र सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर,उपनिरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते