शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

व सा.का. शासन नियुक्त अवसायक कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

कारखाना व्यवस्थापनाने, लोकनियुक्त संचालक मंडळाने सन २००९/२०१५/२०१६ या कार्यकाळात कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अनियमितता, अनुत्पादक बाबीवरील प्रचंड खर्चामुळे थकीत ...

कारखाना व्यवस्थापनाने, लोकनियुक्त संचालक मंडळाने सन २००९/२०१५/२०१६ या कार्यकाळात कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अनियमितता, अनुत्पादक बाबीवरील प्रचंड खर्चामुळे थकीत कर्ज, ऊस उत्पादक देणी, कामगार देणी, इतर देणी यामुळे कर्जाच्या प्रचंड खाईत कारखाना सापडला आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र सरफेसी कायदा २००२/१३(२) नुसार कारखान्याची संपूर्ण मालमत्ता, संपत्ती जप्त केली असून, कारखान्यावर शासन नियुक्त अवसायक नियुक्त केला असल्याने सभासद हक्क संपुष्टात आलेला आहे. शासन नियुक्त तत्कालीन प्राधिकृत मंडळ, राज्य सहकारी बँक यांनी कारखाना परस्पर धाराशिव साखर उद्योग उस्मानाबाद यांना प्रदीर्घ काळासाठी वार्षिक भाडेतत्त्वावर दिलेला आहे. हा प्रदीर्घ भाडेकरार अव्यवहार्य असून सभासदांचा विश्वासघात झाला असल्याने, राज्य सहकार साखर कारखाना भाडेतत्त्व उच्च अधिकार समितीसमोर कामकाज सुरू आहे. सभासद हक्क हिरावून घेतल्याने या कामकाजावर परिणाम होत आहे, सभासद हक्क पुनर्स्थापित करावा अशी मागणी असून, या प्रकरणी सुनावणी घ्यावी अशी मागणी याचिकेत देवरे यांनी केली आहे.

इन्फो...

जप्ती आदेश मागे घ्यावा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखाना परस्पर भाडेतत्त्वावर दिला असताना, बँकेने निर्धारित केलेले वार्षिक भाडे आकारणी होत असेल तर,जप्त मालमत्ता मुक्त्त होणे आवयश्यक आहे. कारखान्यावर असलेला जप्ती आदेश हटवून गेलेली प्रतिष्ठा मिळवून द्यावी अशी अपेक्षा याचिकेत आहे.

इन्फो...

अहवाल सादर करण्याचे आदेश

वसाका कारखान्यावर नियुक्त अवसायक कार्यमुक्त करण्यासह, कारखाना कामकाज व जबाबदारी निश्चित करणारी ८८ खालील चौकशी कामकाजाची प्रगती याबाबत तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश प्रादेशिक संचालक नगर यांना साखर संचालक, प्रशासन साखर आयुक्त पुणे यांनी दिले असल्याची माहिती देवरे यांनी दिली.