शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

...आणि गोदाघाटावर जमली गर्दी

By admin | Updated: May 31, 2014 01:08 IST

पंचवटी : गाडगे महाराज पुलाखाली दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे मेसेज भ्रमणध्वनी व व्हॉटस ॲपवर आले आणि युवकांनी लागलीच गाडगे महाराज पुलाकडे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यातच पोलीसांनी अडविले त्यातच वाहतुकीची कोंडी त्यामुळे निश्चितच गोदाघाटावर कोणत्यातरी चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे हे बघण्यासाठी शेकडो युवकांनी गोदाघाटावर धाव घेतली.

पंचवटी : गाडगे महाराज पुलाखाली दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे मेसेज भ्रमणध्वनी व व्हॉटस ॲपवर आले आणि युवकांनी लागलीच गाडगे महाराज पुलाकडे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यातच पोलीसांनी अडविले त्यातच वाहतुकीची कोंडी त्यामुळे निश्चितच गोदाघाटावर कोणत्यातरी चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे हे बघण्यासाठी शेकडो युवकांनी गोदाघाटावर धाव घेतली. दबंग ३ चे चित्रीकरण बघण्याच्या इराद्याने युवक गोदाघाटावर आले मात्र तेथिल दृश्य बघून हे चित्रपटाचे चित्रीकरण की काही घटना घडली हे समजेनासे झाल्याने अनेकांनी गोदाघाटावर तळ ठोकला. शेकडो पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाच्या गाडया, रुग्णवाहिका, शेकडो नागरीकांचा जमाव बघून सुरूवातीला काय झाले हे कोणालाच समजेना मग त्यातच काही युवकांनी थेट पोलीसांना विचारले दादा कोणत्या पिकचरचे शुटींग चालू आहे दादा भडकले अरे हा काय तमाशा नाही आणि शुटींगही नाही हे पोलीसांचे मॉक ड्रिल चालू आहे. काही घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापनाने काय दक्षता घ्यायची याचे प्रात्यक्षिक चालू असल्याचे सांगताच त्या तरूणांनी आले त्यादिशेने काढता पाय घेतला. गोदाघाटावर मॉक ड्रिल चालू असल्याने अनेकांनी मित्रांना भ्रमणध्वीनवर पिकचरचे शुटींग चालू असल्याचे मेसेज पाठविले त्यामुळे चित्रपटातील हिरो हिरोइनला बघण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मात्र प्रत्यक्षात गोदाघाटावर चित्रपटाचे चित्रीकरण नव्हे तर मॉक ड्रिल सुरू असल्याचे कळताच अनेकांनी घरचा रस्ता धरला. (वार्ताहर)