शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली अमरावती रेल्वे गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:27 IST

मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांत नाराजी : २५ जानेवारीपासून होते नियोजन

मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणारी गाडी क्रमांक ०२११२ अप अमरावती- मुंबई विशेष गाडी आणि गाडी क्रमांक ०२१११ डाऊन मुंबई-अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. अमरावती- मुंबई गाडी दररोज अमरावतीहून १९.१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मुंबईला ६.१५ वाजता पोहोचणार होती. भुसावळ, जळगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूरबरोबरच नाशिक रोडलाही तिला थांबा असल्याने नाशिककरांची मोठी सोय होणार होती. दरम्यान गाडी क्रमांक ०२०३७ अप पुरी- अजमेर विशेष गाडी दिनांक २१ जानेवारीपासून दर सोमवार व गुरुवारी पुरी स्टेशनहून २३.०५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अजमेर स्टेशनवर १८.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२०३८ डाऊन अजमेर- पुरी विशेष गाडी दिनांक २६ जानेवारीपासून दर मंगळवार व गुरुवारी अजमेर स्टेशनहून १८.५० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशनला १४.२५ वाजता पोहोचेल.कोरोनाचे नियम बंधनकारककेवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविडशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स