शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या राजाची अमेरिका वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST

लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून न्यू यॉर्क व सॅनफ्रान्सिस्कोला अडीच मेट्रिक टन केशर व बदाम यासह दहा टन आंब्याचा पहिला कंटेनर गुरुवारी रवाना झाला.

ठळक मुद्देआंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहेआंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा या प्रमुख जातींचा समावेश

लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून न्यू यॉर्क व सॅनफ्रान्सिस्कोला अडीच मेट्रिक टन केशर व बदाम यासह दहा टन आंब्याचा पहिला कंटेनर गुरुवारी रवाना झाला. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. येथील विकिरण केंद्रावर आंब्यांबरोबरच कांदा- ४९३ मेट्रिक टन, इतर कच्चा माल- ३८९ मेट्रिक टन, मसाले- ६४० मेट्रिक टन व खाण्यायोग्य नसणारे पदार्थ- १० मेट्रिक टन अशा पदार्थांवर विकिरण प्रक्रिया झाली होती. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन हा आंबा पाठविला होता. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर बंदी घातल्याने हापूसचे आता काय होणार ही चिंता होती; पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा आता मोठ्या झपाट्याने अमेरिकेबरोबरच अन्य देशांतही कूच करू लागला आहे. अमेरिकेला पाठविण्यात येणाºया हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील पहिली विकिरण प्रक्रि या करण्यात आली. या केंद्रात मुंबईच्या अ‍ॅग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जात आहे. येथे ३१ आॅक्टोबर २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.लासलगावहून कंटेनर रवानालासलगाव येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाºया आंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा या प्रमुख जातींचा समावेश आहे. आंब्यावर विकिरण प्रक्रि या पूर्ण करून हा हापूस लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया,न्यू यॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे. मागील वर्षी सुमारे ५६० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला पाठविला होता. यावर्षी ६०० मेट्रिक टन आंब्याचे उद्दिष्ट असल्याचे समजते.