शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड माळरानावर अमेरिकन गोड मक्याची शेती

By admin | Updated: July 21, 2016 23:29 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : निनावी येथील शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ

लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हेशेती व्यवसायात शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येत असल्यामुळे शेतीकडे पाठ फिरवणारे काही शेतकरी कसेबसे जीवन कंठीत बसतात; मात्र कृषिक्षेत्रातील तंत्रज्ञानाला प्रचंड मेहनतीची जोड देत काही महत्त्वाकांक्षी शेतकरी नवेनवे प्रयोगांच्या शोधात ओसाड माळरानावर देखील यशस्वी शेती करून दाखवितात याचे उत्तम उदाहरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील निनावी येथील शेतकरी शंकर नामदेव टोचे यांनी तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अमेरिकन गोड मक्याची यशस्वी केलेल्या शेतीचे.इगतपुरी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांनी शेतीमध्ये फुलवलेला अमेरिकन गोड मका बाजारात दाखल झाला असून, उत्पन्नदेखील चांगले मिळत आहे. साकूर फाटा येथील बालाजी अँग्रोच्या मार्गदर्शनामुळे नेत्रा सिड्सचे अमेरिकन स्वीटकॉर्न या गोड मक्याचे बियाणे घेऊन त्यांनी ओसाड माळरानावर सरी पाडून लागवड केली आहे. विविध प्रकारची रासायनिक खते व पोटॅश खतांचा मारा करून साधारण ७५ दिवसांच्या प्रयत्नातून कणीस तयार झाले झाले.हे दाणेदार कणीस आता मुंबईसारख्या ठिकाणी विक्रीसाठी जात आहे. अमेरिकन स्वीटकॉर्न ही खाण्यास अत्यंत गोड असून, तिचे फळेदेखील जास्त वजनदार आहेत. त्यांना किरण मांडे व अतुल गोसावी यांच्या मार्गदर्शनातून हा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.