शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओकडून रुग्णवाहिकांचे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना कमी वेळात रुग्णालय, स्कॅन सेंटरपर्यंत पोहचविण्यासाठी रुग्णवाहिकांना प्राधान्य दिले जात आहे. ऑक्सिजन ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना कमी वेळात रुग्णालय, स्कॅन सेंटरपर्यंत पोहचविण्यासाठी रुग्णवाहिकांना प्राधान्य दिले जात आहे. ऑक्सिजन सेवा असलेल्या रुग्णवाहिकांना तसेच विनाऑक्सिजनच्या रुग्णवाहिकांना मागणी वाढली. दरम्यान, बहुतांश रुग्णवाहिकांच्या चालकांकडून जादा रक्कम परिस्थितीचा गैरफायदा म्हणून आकारली जात असल्याच्या तक्रारी राज्यात वाढल्या. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षीच प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित करत रुग्णवाहिकांसाठी दार निश्चित करावे, असा निकाल दिला होता. हे दरपत्रक आरटीओच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती. या आदेशानुसार उशिरा का होईना नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली आणि रुग्णवाहिकांसाठी दार निश्चित करण्याकरिता ''मुहूर्त'' मिळाला. विविध अटीशर्थींसह रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे आता काही प्रमाणात आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. अवाच्या सव्वा होणारी लूट थांबेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरटीओने दरपत्रक जारी करण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत आहे किंवा नाही, याकडेही लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे. एखाद्या रुग्णवाहिकाच्या चालकाकडून जादा रकमेची मागणी होत असल्यास किंवा त्यासाठी अडवणूक केली जात असेलतर थेट आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

----इन्फो----

...असे आहेत दरपत्रक (तक्ता)

वाहनांचा प्रकार - २५ किमी/ २ तासांसाठी

1) मारुती ओम्नी / इको (नॉन ए.सी) - ६०० रुपये

2) टाटा सुमो किंवा जीपसदृश वाहन (नॉन ए.सी)- ७०० रुपये

3) टेम्पो ट्रॅव्हलर/छोटा टेम्पो/मोठा ४०७ टेम्पो च्या साठ्यावर बांधणी केलेली रुग्णवाहिका (नॉन ए.सी) - ९२० रुपये.

4) आयसीयू कार्डियाक वातानुकूलित रुग्णवाहिका : ११५० रुपये.

-----

रकाना (२) प्रतिदिन २४ तासांकरिता

अनु.क्रमांक नुसार -

1) १२०० रुपये

2) १४०० रुपये

3) १८५० रुपये

4) २३०० रुपये

------

रकाना (३) प्रति किलोमीटर (रुपये)

1) १३

2) १४

3) १५

4) २३

: