शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला

सिडको : येथील अंबिकानगर परिसरातील नंदनवन कॉलनी व उमा पार्क सोसायटीला जोडणाऱ्या पुलाचा कठडा कोसळल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे.तेरा वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाने तयार केलेल्या पुलाचा कठडा संततधार पावसामुळे कोसळला. त्यातच पुलाच्या पायाचा भागदेखील कमकुवत झाल्याने हा पूल केव्हा कोसळेल याची शाश्वती नसल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे. मात्र या रहिवासी कॉलनीत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने नाइलाजास्तव धोका पत्करावा लागत आहे. या कॉलनीत वहिवाटीसाठी दिलेले दोन रस्ते शेजारच्या कॉलनीतील व्यवस्थापनाने भिंत व मंदिर बांधून बंद केलेले असल्याने रहिवाशांना याच पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यातच पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा वाद न्यायालयात प्रविष्ट असल्याने या रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती व पर्यायी रस्त्याची व्यवस्था न झाल्यास शनिवारी सहकुटुंब धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.दरम्यान, नगरसेविका रत्नमाला राणे यांच्या वतीने भूषण राणे यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी परिसरातील रहिवाशी भूषण भामरे, वासुदेव भावसार, संजय मगर, हेमंत शिंदे, सुजित पाटील, कौतिक रौंदळ, प्रवीण भावसार, राहुल चव्हाण, सतीश पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)