शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

नगरसेवक निधीबाबत अस्पष्टता

By admin | Updated: June 20, 2017 01:28 IST

महापालिका : आर्थिक स्थितीनुसार होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात महापौरांनी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी (दि.१९) झालेल्या महासभेत महापौरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सदस्यांनी नगरसेवक निधीबाबतची घोषणा प्रत्यक्ष अमलात आणण्याची मागणी केली. मात्र, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेऊन उचित निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत त्याबाबतची अस्पष्टता कायम ठेवली.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर करताना नगरसेवक निधी म्हणून ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी त्यात आणखी ३५ लाख रुपयांची भर घालत निधी ७५ लाख रुपयांवर नेला. महापौरांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, परंतु निधीची जुळवाजुळव करण्याबाबत प्रशासनाची चिंता वाढविली. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेता पाउण कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत प्रशासनाने असमर्थता दर्शविली. एवढा निधी आणायचा कुठून, असा सवालही केला जाऊ लागला. त्यामुळे महापौरांची अडचण वाढली. त्यात महापौरांनी मागील पंचवार्षिक काळातील पराभूत नगरसेवकांचा निधी वळविण्याचा मार्ग सुचविल्याने त्याची पूर्तता करणेही प्रशासनाला अवघड बनले आहे.