सिन्नर : वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन एसटीचे विभागीय अधिकारी विजय झगडे यांनी केले. राज्य परिवहन महामंडळ तसेच महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राच्या वतीने सिन्नर एसटी आगाराने आयोजित केलेल्या मासिक सुरक्षा मोहिमेंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सिन्नर आगाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार तडवी, ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे सिन्नर तालुका प्रमुख डॉ. श्यामसुंदर झळके, कार्यशाळाप्रमुख सौरभ रत्नपारखी, वाहतूक नियंत्रक भास्कर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवासी महासंघाचे पदाधिकारी डॉ. श्यामसुंदर झळके यांनी प्रवास करताना वाहकांनी वेगावर नियंत्रण ठेवून रस्त्याची परिस्थिती पाहून वाहन चालवावे. प्रत्येक वाहनचालकाने अपघात संरक्षण विमा घेण्याची गरज आहे. कारण, आपण अपघातात मृत्यू पावल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास विमा कंपनी सर्व खर्च करते तसेच मृत्यूपश्चात वारसदार व्यक्तीस नुकसानभरपाई मिळते. त्यामुळे कुटुंबाला संकटकाळात दिलासा मिळतो, असे सांगितले. यावेळी वाहतूक पोलीस यांनी चांगली कामगिरी करून सुरक्षा मोहिमेस मदत केली, याची दखल घेऊन दिनेश खैरनार, राहुल पगारे, संतोष थेटे, पंडित मोकळ, जितेंद्र भाबड, छोटू रंगतवान या वाहतूक पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डी.आर. देशमुख, सुनीता चव्हाणके, सुनीता सांगळे, अलका शेळके, वैशाली बोऱ्हाडे, नयना भालेराव, नम्रता बोरसे, अनिता वनसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी तर आभार सौरभ रत्नपारखी यांनी मानले.
-------------------
सिन्नर आगारात वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात बोलताना विजय झगडे. व्यासपीठावर भूषण सूर्यवंशी, डॉ. श्यामसुंदर झळके, राजकुमार तडवी आदी. (२३ सिन्नर १)
===Photopath===
230121\23nsk_2_23012021_13.jpg
===Caption===
२३ सिन्नर १