शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गौरींच्या आगमनाची लगबग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST

नाशिक : तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून अनेक घरांमध्ये येणाऱ्या गौराईचे स्वागत करण्यासाठी विशेषत्वे महिला वर्गात मोठे उत्साहाचे वातावरण ...

नाशिक : तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून अनेक घरांमध्ये येणाऱ्या गौराईचे स्वागत करण्यासाठी विशेषत्वे महिला वर्गात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. उद्या, रविवारी होणाऱ्या गौराईच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर साड्यांची दालने, सजावटीच्या साहित्याची दालने तसेच मोत्याचे हार आणि अन्य साहित्यखरेदीसाठी महिलांनी आठवडाभरापासूनच प्रारंभ केला आहे. गणरायांबरोबरच गौरीच्या आगमनासाठी केल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचीदेखील लगबग घरोघरी सुरू आहे.

गौरी आगमनाच्या पूर्वदिनी अर्थात गणेशचतुर्थीला शहर, उपनगर परिसरांतील बाजारपेठेत गौरी सजावटीच्या साहित्यखरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत होती. गौरी सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यात गौरीच्या दागिन्यांना अधिक महत्त्व असते. शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत गौरीच्या सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध असल्याने या खरेदीला महिलांकडून प्राधान्य दिले जात होते. गौरीच्या दागिन्यांत मंगळसूत्र, नथ, कमरपट्टा, राणीहार अशा दागिन्यांना विशेष मागणी होती; तर अनेक महिलांनी सकाळी गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर दुपारी साड्यांच्या दालनांमध्येदेखील गौरीसाठी साडीखरेदीकडे मोर्चा वळविला होता. गौराईसाठी विविध प्रकारच्या साड्याही बाजारात असल्या तरी त्यात पारंपरिक, काठापदराच्या, भरजरीच्या, आकर्षक रंगांच्या विविध नक्षीकाम असलेल्या साड्यांना विशेष मागणी होती. गौरी सजावटीसोबत समोर मांडण्यात येणाऱ्या पदार्थांनाही महत्त्व असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये शुक्रवारपासूनच फराळाच्या पदार्थांच्या तयारीलादेखील वेग देण्यात आला होता. गौरी बसविण्याच्या पद्धती तसेच अनेक घरांमधील चालीरीती विभिन्न असल्या तरी गौराईबाबतचा उत्साह सर्वत्र सारखाच आहे. काही घरांमध्ये गौरी पाटावर विराजमान होतात. काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या, कुठे खड्यांच्या गौरी, कुठे माठावर, कुठे हंडा-कळशीवर बसविल्या जात असल्याने परंपरेनुसार सर्व घरांमध्ये गौराईच्या आगमनाची लगबग दिसून येत आहे.