शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सलून सुरू करण्यास परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:52 IST

नाशिक : कोरोनामुळे मागील ८० दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेशहरातील विविध भागात दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नाशिक : कोरोनामुळे मागील ८० दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेशहरातील विविध भागात दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.नाशिकरोड सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नाशिकरोड येथे बुधवारी सलून व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर फलक लावून आंदोलन केले. राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेकोरोनामुळे सलून व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात निषेध दिन पाळण्यात आला. नाशिकरोड येथे सलून व्यावसायिकांनी दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. शासनाने लवकरच सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये नाभिक समाज युवा अध्यक्ष राहुल तुपे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, बाळासाहेब पगारे, यशवंत निकम, शुभम पगारे आदी सहभागी झाले होते.सातपूर परिसर नाभिक मंडळाच्या वतीने सातपूर गावातील पप्पाज फेटा दुकानाजवळ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नाभिक समाजाला अपशब्द बोलल्याबद्दल विवेक लांबे यास त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व नाना वाघ, दीपक निर्वाण यांनी केले. यावेळी गोपी सैंदाणे, वासू निकम, विकास पगारे, संदीप डाके, राजू सोनवणे, कैलास कणसे, संदीप वाघचौरे, विकास सोनवणे, आदींसह सलून व्यावसायिक व समाज बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक