शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी पदविकेसाठी १८ सप्टेंबरला जागावाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी शनिवारी (दि. ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी शनिवारी (दि. १८ ) जागावाटप जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना संचालनालयातर्फे करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आलेल्या अर्जांवरील प्रक्रियेनंतर आता पुढील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. ९) तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागाही सोमवारीच (दि. १३) प्रदर्शित करण्यात येणार असून, कॅपराउंड एकसाठी १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ऑप्शन फॉर्म उमेदवाराच्या लॉगईनमधून भरता येणार आहे. त्यानंतर शनिवारी (दि. १८) पहिल्या फेरीसाठी जागावाटप प्रदर्शित करण्यात आल्यानंतर १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान वाटप झालेल्या जागेवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगईनद्वारे स्वीकृती नोंदवावी लागणार आहे. तसेच प्रवेशाची संधी मिळालेल्या जागेवर १९ ते २३ या कालावधीत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना संचालनालयातर्फे करण्यात आल्या आहेत.