शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:01 IST

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करतेकर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहन

उद्धव ठाकरे : फॉर्म्युला विधान परिषदेपुरताच; रिफायनरीचा प्रकल्प विदर्भात नेण्याचा सल्ला

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. याशिवाय भाजपा व सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस आणि राष्टÑवादीला उकळ्या फुटल्या म्हणून ते एकत्र आले असले तरी शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्टÑाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे; मात्र विदर्भातील आमदारांची मागणी असल्याने हा प्रकल्प तेथे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक होत असून, ज्या ठिकाणी शिवसेनेचे मतदार कागदावर जास्त दिसत आहेत आणि जिंकण्याची शक्यता आहे, अशा तीन ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांना मैत्री, ऋणानुबंध आणि नातेसंबंधांचा वापर करून मते मिळवण्याचे देखील अधिकार आहेत. ज्याठिकाणी पक्षाने उमेदवार उभे केलेले नाही त्याठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्थात, ही निवडणूक वेगळी असते, त्यात पक्षाची सदस्यसंख्या निश्चित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा किंवा विधानसभेत असा निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय हा पक्षाच्या राष्टÑीय कार्यकारिणीने घेतला आहे, त्यात बदल होणार नाही असे स्पष्ट करून ठाकरे यांनी पंधरा वर्षे सत्तेत राहून एकमेकांशी भांडण करणाऱ्या अगदी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाल्याने ते फाईलींवर सही करीत नाही म्हणणारे एकत्र आले आहेत. शिवसेना आणि भाजपा वेगळे लढणार असल्याने त्यांना मतविभागणीचा फायदा होईल असे वाटते आहे. मात्र, गेली ६५ वर्षे त्यांचा कारभार जनतेला माहिती आहे, त्यामुळे त्यांना साथ मिळणार नाही, असेही ते म्हणाले.नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. परंतु देशात समुद्रकिनारा नसलेल्या सात ठिकाणी अशा प्रकारचे रिफायनरी कारखाने आहेत. त्यामुळे कोकणात प्रकल्प सुरू करण्याचा संबंध येत नाही. मुळात भाजपाचे आमदार देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या पक्षाच्या अन्य आमदारांनीदेखील मागणी केली असल्याने हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. विदर्भाचा विकास करू असे म्हणून विकास होणार नाही, तर तेथे अशाप्रकारचे उद्योग आणून विकास केला पाहिजे असेही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चीट यावर मात्र ठाकरे बोलले नाहीत. जे घडले ते सर्वांसमोर आहे, त्यात काय भूमिका असणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.यावेळी खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, रवींद्र मिर्लेकर, भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहनकर्नाटक निवडणुकांबाबत बोलताना नावातच कर नाटक आहे, त्यामुळे काय बोलायचे अशी शाब्दिक कोटी करून ठाकरे यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी मतदारांनी मतभेद न बाळगता एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.वनगा यांना उमेदवारी देण्याची तयारीडहाणू येथील भाजपाचे माजी खासदार चिंतमन वनगा यांच्या कुटुंबीयांनी भाजपाने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदिवासी भागात हिंदुत्व रुजवणाºया वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. वनगा यांच्या मुलांपैकी कोणी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्यास शिवसेना त्यांच्याबरोबर राहील, असेही ठाकरे म्हणाले.मोदींना रजनीकांत घाबरतोतेल रिफायनरीचा प्रकल्प समुद्रकिनारीच असावा म्हणून विदर्भात नेता येत नसेल तर नरेंद्र मोदींना सांगा ते पाच मिनिटांत विदर्भात समुद्र आणतील, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. अलीकडे तर रजनीकांतही मोदींना घाबरतो असे सांगून त्यांनी त्यावरही कळस केला. अर्थात, मी गमतीने म्हणतोय नाहीतर उद्या माझ्यात आणि रजनीकांतमध्ये वाद व्हायचा असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. रिफायनरी कारखाना समुद्रकिनाºयाशिवाय होऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांचे मत असेल तर त्यावर कार्यशाळा घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

...तर आम्ही शत्रू आहोतहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करते आणि समाजसेवाही करते. परंतु जर शिवसेना ही क्रमांक एकचा शत्रू असे भाजपा म्हणत असेल तर जनतेनेच त्याचा विचार केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.