शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:43 IST

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप

सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आपण आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग येऊन हरणबारी डावा कालवा आणि तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी ७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा,केळझर चारी क्र मांक आठ व पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे डाव्या कालव्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळेच या प्रकल्पांची साठ ते सत्तर टक्के कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आमदार चव्हाण म्हणाल्या की, या प्रकल्पाची कामे करतांना भूसंपादनात अनेक शेतकर्यांच्या जमिनी जात असल्यामुळे विरोध झाला त्यामुळे साहजिकच शेतकर्यांची मने वळविण्यात बराच वेळ गेला.बागलाणमधील हे दोन्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकामी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एवढा मोठा निधी पदरात पाडून घेण्यात यश आल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.