शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नाना महाराजांवरच सारी भिस्त

By admin | Updated: February 12, 2017 00:32 IST

दावेदारी : पॅनलचे यश-अपयश मातब्बरांवरच निर्भर

नाशिक : दोन माजी महापौर, दोन स्थायी समितीचे माजी सभापती आणि आजी- माजी नगरसेवकांच्या दावेदारीने गाजलेल्या प्रभाग १३ मध्ये काही बड्या दावेदारांनी माघार घेतली असली तरी रिंगणात अजूनही महाराज, नाना असे बाहुबली उमेदवार रिंगणात आहेत. साहजिकच, पक्षीय पॅनलपेक्षा हे भाऊ, महाराज, नानाच आपल्या समवेत या प्रभागाचे भवितव्य ठरविणार आहे.पूर्व प्रभाग तसा राजकीय बलाशाली व्यक्तींचाच प्रभाग मानला जातो. येथे पक्षीय प्रभुत्वापेक्षा राजकीय घराण्यांच्या दबदब्यावरच अधिक निवडणुका होतात. आजवर छोटे प्रभाग असल्याने खैरे, वावरे, चव्हाण, वाघ यांचे भौगोलिक कार्यक्षेत्र वेगळे असले तरी आता बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने सर्वांचाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून सर्वच बलशाली उमेदवार रिंगणात आले आहेत. इच्छुकांपैकी विनायक पांडेंसारख्या प्रभुतींनी काहींनी माघार घेतल्याने आणखी चुरस असलेल्या लढती टळल्या असल्या तरी प्रभागातील कोणते पॅनल जिंकणार हे त्या पॅनलमधील बलशाली उमेदवार ठरविणार आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भागात सध्या शाहू खैरे, विनायक खैरे, विनायक पांडे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. साहजिकच इच्छुकांचे राजकारण त्या भोवतीच फिरत आहे. आपल्या सुपुत्राला उमेदवारी न मिळल्याचे निमित्त करून विनायक पांडे यांनी माघार घेतली असली तरी कोणत्याही पक्षाला सर्वच जागांसाठी सक्षम न सापडल्याने त्यांची मदार सक्षम उमेदवारांवर आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत अन्यत्र अन्य पक्षांवर नजर असली तरी या प्रभागात कॉँग्रेसवर नजर होती. शाहू खैरे हे कोणासमवेत पॅनल करतात ही उत्कंठा होती. कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक वत्सला खैरे आणि मनसेच्या नगरसेवक तसेच शाहू (महाराज) खैरे यांच्या नातेसंबंधातील विद्यमान नगरसेवक सुरेखा भोसले तसेच राष्ट्रवादीचे गजानन शेलार असे हे पॅनल बनले आहे. विनायक पांडे यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या आधीच माघार घेतल्याने शिवसेनेची मदार मनसेतून शिवसेनेत आलेले माजी महापौर यतिन (महाराज) वाघ तसेच आता शिवसेनेत दाखल झालेले अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण यांच्यावर आहे. प्रभागात सर्वाधिक लक्षवेधी जागा म्हणजे १३ ब म्हणजेच ओबीसी होय. या प्रभागातून शिवसेनेचे अ‍ॅड. यतिन वाघ आणि राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांची आमने-सामने लढत आहे. नातेवाईक असलेल्या दोघांचे आमने-सामने येणे संवेदनशील ठरले आहे. शेलार एकेकाळचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना वडाळा परिसरातून उमेदवारी दिली, त्यात ते पराभूत झाल्यानंतर सत्तेपासून दूर आहेत, त्यापूर्वीही त्यांचा एकदा पराभव झाला होता. त्यामुळे विजयासाठी ते आसुसले आहेत. याच प्रवर्गात मृणालराज घोडके (भाजपा), ईश्वर कदम (बहुजन विकास आघाडी), चंद्रकात रणदिवे (धर्मराज्य पक्ष), धनश्री वाघ (अपक्ष) नशीब आजमावत आहेत. (प्रतिनिधी)