नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीतून अर्ज बाद झालेल्या तिघा उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले आहे. दरम्यान, यानिवडणुकीतून नांदगाव तालुका सोसायटी गटातून एकाने माघार घेतली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी छाननीदरम्यान आलेल्या नऊ हरकतींवरील सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. त्यावेळी कोंडाजी मामा आव्हाड हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोसायटीचा लेखा परीक्षण दर्जा अ व ब ऐवजी क असल्याने त्यांना बाद ठरवावे ही हरकत सुनावणीनंतर मान्य करण्यात आली होती, तर चंद्रकांत राजे यांची सोसायटी थकबाकीदार असल्याचा आक्षेप मान्य करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाच्या विरोधात आव्हाड, चंद्रकांत राजे आणि शिवाजी ढेपले यांनी विभागीय सहकार सहनिबंधकांकडे अपील केले आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी नांदगाव सोसायटी गटातून प्रकाश कवडे यांनी माघार घेतली.
कोंडाजी आव्हाडांसह तिघे अपिलात
By admin | Updated: April 30, 2015 01:54 IST