शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मालेगावी ब्रिटनमधून आलेले सातही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:33 IST

जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. 

मालेगाव : जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.   अत्यंत वेगाने संसर्ग होऊन फैलावणाऱ्या नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्य शासनातर्फे पुरेशी काळजी घेतली जात आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांना नव्या विषाणूची बाधा तर नाहीना म्हणून त्यांची टेस्ट केली जात आहे. मालेगावातही ब्रिटनमधून सात जण आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. तत्काळ सातही जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. nमालेगावी सर्वे नं. १६ बाग - ए- महेफुस भागातील सात नागरिक ब्रिटनमधून आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांची ‘टेस्ट’ केली होती. सातही जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. nब्रिटनमधून आलेले सातही नागरिक एकाच घरातील सदस्य असून त्यांना स्वतंत्र बंगल्यात ठेवण्यात आले आहे. त्यांना आणखी सात दिवस घराबाहेर पडू नका, अशा सूचना मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या