शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अष्टपैलू अभियंत्यांची गरज

By admin | Updated: May 20, 2014 01:06 IST

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर होत असलेले विविध बदल अंगीकारून त्याप्रमाणे सुविधा पुरविणार्‍या अभियंत्यांची आज गरज- जलसंपदामंत्री सुनील तटकरे

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर होत असलेले विविध बदल अंगीकारून त्याप्रमाणे सुविधा पुरविणार्‍या अभियंत्यांची आज गरज असून, प्रबोधिनीने अशा प्रकारचे अष्टपैलू अभियंते तयार करावेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केले. महाराष्टÑ अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कालिदास कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जगात आज उंचच उंच इमारती बांधण्याचे काम सुरू झाले आहे. जमिनीच्या कमतरतेमुळे असे होत असताना, त्या उंच इमारतीत सर्वच रहिवाशांना सर्व सुविधा कशा पोहोचविल्या जातील याची खबरदारी अभियंत्यांना घ्यावी लागेल. धरण बांधताना केवळ धरणाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी अभियंत्यावर नसून त्या पाण्याचे शेतकर्‍यांपर्यंत नियोजनही अभियंत्यालाच करावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारावर विचार करून त्याप्रमाणे स्थापत्यांची निर्मिती करतानाच पाण्यावरून होणारे संभाव्य तिसरे महायुद्ध टाळण्याची मोठी जबाबदारी अभियंत्यांवर आली आहे. त्यामुळे प्लंबिंगचा अभ्यास करण्याची वेळही अभियंत्यांवर आली आहे. यासारख्या विविध क्षेत्रातील अभ्यास आता अभियंत्यांना करावा लागणार असून, त्यांना अष्टपैलूच व्हावे लागेल. त्याशिवाय उज्ज्वल भवितव्याची नांदी दिसणार नाही, असेही तटकरे म्हणाले. अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमधून बाहेर पडणारे अभियंते तावून सुलाखून बाहेर येतात यात शंका नाही; परंतु जर त्यांना शिक्षणासाठी आणखी काही सुविधा पुरवायच्या असतील आणि त्यासाठी निधीची आवश्यकता असेल तर तो दिला जाईल, असे आश्वासनही तटकरे यांनी दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता मनोज केंद्रे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रबोधिनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर विशेष कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक चं. आ. बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना प्रबोधिनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी सध्या अभियंत्यांसमोर असलेल्या विविध आव्हानांचा परामर्श घेतला आणि त्यादृष्टीने नवीन प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर एकनाथ पाटील, अधीक्षक अभियंता जी. जी. बैरागी, शं. मा. उपासे, रा. गो. शुक्ल, ह. का. गोसावी आदि उपस्थित होते. संजय मुरकुटे व किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले. जी. जी. बैरागी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)