शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व वीजउपकेंद्रे आता स्काडा सेंटरवरून नियंत्रित

By admin | Updated: March 22, 2017 01:11 IST

नाशिकरोड :शहराला वीज पुरवठा करणारी सर्व वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणाऱ्या स्काडा सेंटरचे कामाची केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

नाशिकरोड : नाशिक शहराला वीज पुरवठा करणारी सर्व वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रित करणाऱ्या जेलरोड येथील स्काडा सेंटरचे कामाची केंद्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. नाशिक शहरातील २७ वीज उपकेंद्रे एकाच ठिकाणाहून नियंत्रीत करणारी मध्यवर्ती यंत्रणा जेलरोड शिवाजीनगर येथील स्काडा सेंटरमध्ये (सुपरवायजरी कंट्रोल अ‍ॅँड डेटा एक्वीझिशन सिस्टीम) उभारली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार असून त्या पार्श्वभूमीवर नुकतीच केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी यांनी स्काडा सेंटरला भेट देऊन पाहणी करत सविस्तर माहिती घेतली. सध्याच्या स्थितीला पाच उपकेंद्र स्काडा सेंटरला जोडले असून उर्वरित २२ उपकेंद्र जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्काडा सेंटरमधून उपकेंद्रातून सुरू असलेल्या वीज पुरवठ्याची सद्यस्थिती, कोणत्या भागात किती दाबाने वीजपुरवठा होत आहे, वीज पुरवठ्यात आलेले अडथळे आदि बाबी आॅनलाइन पाहता येणार आहे. तसेच संबंधित उपकेंद्रातील वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रणालीही स्काडा सेंटरमधून उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे वीज खंडित होण्याचे ठिकाण व कारण लगेच कळणार असल्याने दुरुस्तीही तातडीने होऊ शकेल. वाहिनीवरील बिघाड शोधण्यासाठी सध्या लागणारा वेळ या प्रणालीमुळे वाचणार आहे. यावेळी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी प्रदीप कुमार, महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, प्रशिक्षण व सुरक्षा मुख्य महाव्यवस्थापक रंजना पगारे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर, एस.एस. सवाईराम, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश लंभाते, उपकार्यकारी अभियंता अजय सुळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्काडा सेंटरमधील कामाच्या पाहणीप्रसंगी केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव पी.के. पुजारी. समवेत दीपक कुमठेकर, भुजंग खंदारे, प्रदीप कुमार, चंद्रशेखर येरमे, अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, रंजना पगारे आदि.