शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या निषेधार्थ भाजपासह सर्वपक्षीय नेते एकत्रआक्रमक भूमिका : आंदोलन छेडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:14 IST

नाशिकरोड : मनपा प्रशासनाच्या घरपट्टीसोबत शेती व निवासी पार्किंग करवाढीच्या निषेधार्थ जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत आक्रमक आंदोलन करण्याचा सूर आळवला.

ठळक मुद्देजेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात बैठककरवाढीच्या विरोधात नागरिकांनी कुटुंबीयांसह आंदोलनात उतरावे

नाशिकरोड : मनपा प्रशासनाच्या घरपट्टीसोबत शेती व निवासी पार्किंग करवाढीच्या निषेधार्थ जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध करत आक्रमक आंदोलन करण्याचा सूर आळवला.शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने शेती, मोकळ्या भूखंडावरील करवाढ करण्याच्या मनपा आयुक्तांच्या निर्णयाच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी शेती, पार्किंग व घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ मनपा हद्दीतील प्रत्येक गावात शेतकºयांच्या बैठका घेऊन जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. राष्टÑवादी कॉँग्रेसचे गजानन शेलार यांनी करवाढीच्या विरोधात नागरिकांनी कुटुंबीयांसह आंदोलनात उतरावे. मात्र आंदोलनाचा रंग बदलणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर अन्यायकारक करवाढ सहन केली जाणार नाही. याबाबतीत शासनाची भूमिका काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे, असे शेलार यांनी सांगितले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सर्वसामान्यांचे दु:ख शासनाकडे लोकप्रतिनिधींनी पोहचविले पाहिजे. विविध अडचणींमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, मनपा आयुक्त हे फक्त वसुली करायला आले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकरिता सहाही विभागात बैठकीचे आयोजन करून सर्वांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी करवाढी निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली. तर नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी मनपा प्रशासनाने अन्याय केला तर शासनाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नियमानुसार ४० टक्क्यापेक्षा करवाढ करता येत नाही, असेही बग्गा यांनी स्पष्ट केले. शासनाच्या नियमाप्रमाणे ४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ करता येत नाही, असे बग्गा यांनी सांगितले. यावेळी, आयुक्तांनी शेतकºयांवर जमिनींवरच नाही तर पडीत जागेवरही जादा कर लावला असल्याचे अनेक वक्त्यांनी सांगितले.