शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यानजीक अपघातात चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:30 IST

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली.

ठळक मुद्दे मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघेमराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना अपघातअपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान

येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली. अपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून केवळ इंजिन शिल्लक होते.  गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा आटोपून औरंगाबादकडे व्हर्ना गाडीतून (क्र मांक एम.एच.-२०, ई ई.-७२८४) ने पाच जण परतत होते. वैजापूर कडून येवल्याच्या दिशेने ट्रक (क्र मांक एम.एच.१८ एम.३१९४) भरधाव वेगाने येतांना व्हर्ना गाडी खामगाव शिवारात मारुती ८०० कार (एमएच बीडब्ल्वू ५१७८) ला ओव्हरटेक करतांना, समोरून वेगाने येणाºया ट्रकवर आदळली. अपघातात व्हर्ना गाडीतील पाचपैकी तिघे जागीच ठार झाले. त्यात हर्षल अनिल घोलप (२४, रा. गावठाण, रोखडी,पुणे), नारायण कृष्णा थोरात (२१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे ( २३ रा.बजाजनगर ,औरंगाबाद ) यांचा समावेश आहे. मारुती कारमधील वैभव राधाकृष्ण गटकळ (२१,रा. मातेरेवाडी जि.नाशिक) हा सुद्धा जागीच ठार झाला. येवला ग्रामीण रूग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अपघातात गौरव रामपालसिंग प्रजापती (२३,रा. सिडको, औरंगाबाद) व उमेश गोपाल भगत (रा.बजाजनगर, औरंगाबाद ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी ट्रकचालक नूर इब्राहीम शेख, (३५) याला अटक केली आहे.