शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब सर्वेक्षणात विभागातील पाचही जिल्हे पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील ...

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कामगिरीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाराजी व्यक्त केली असून, अनेक जिल्ह्यात या मोहिमेेतंर्गत घरोघरी जाऊन रूग्णांचा शोध घेण्यास टाळाटाळ तसेच त्यांची कोरोना तपासणी करण्यास उदासीनता दिसून आल्याने गमे यांनी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे व त्यांना उपचारार्थ रूग्णालयात भरती करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास हातभार लागण्याबरोबरच घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांचा शोध घेणे सहज शक्य झाले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून ही मोहीम राबवून दरमहा त्याचा आढावा विभागीय आयुक्तांकडून घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी या मोहिमेच्या माध्यमातून रूग्णांचा शोध घेण्यास मोठा हातभार लागल्याची उदाहरणेही आहेत. तथापि, मार्च, एप्रिल महिन्यात या मोहिमेचे काम काहीसे थंडावले असल्याचे विभागीय आयुक्तांना प्रत्येक जिल्ह्याने पाठविलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

संशयित रूग्णांचा शोध घेतल्यानंतरही त्याची तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले असून, काही जिल्ह्यात तर सर्वेक्षणच करण्यात आले नसल्याचे तर संशयित रूग्णांच्या संख्येच्या प्रमाणात तपासणी करण्यात आली नाही. नगरपंचायत, नगरपालिकांची या कामात उदासीनता दिसून आली असल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-----------

विभागीय आयुक्तांची निरीक्षणे

१) नाशिक जिल्हा- इगतपुरी, मालेगाव व येवला तीन तालुक्यात रूग्ण शोध मोहीम अत्यंत कमी आहे. संशयित व्यक्तींची संख्या २४४७ असतानाही १६३१ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले नाहीत.

२) धुळे जिल्हा- संशयित रूग्णांची संख्या ४७८ आहे. परंतु त्यापैकी एकाही व्यक्तीची तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचा उद्देश सफल होत नाही.

३) जळगाव जिल्हा- वरणगाव नगर परिषदेचा अहवाल वस्तुस्थिती दर्शक असल्याचा संशय. जामनेर ग्रामीण, पारोळा, सावदा नगर परिषदेत सर्वेक्षण गांभीर्याने सुरू असल्याचे दिसत नाही.

४) नंदुरबार जिल्हा- शहादा नगर परिषद, तळोदा ग्रामीण, तळोदा शहर या ठिकाणी सर्वेक्षण गांभीर्याने सुरू नाही. ३६१ संशयित रूग्णांपैकी फक्त २० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.

५) अहमदनगर जिल्हा- नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे दिसून येत नाही. संशयित व्यक्तींची संख्या ४९०२ असून, त्यापैकी फक्त ७४३ व्यक्तींचीच टेस्ट घेण्यात आली आहे.