शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खात्यातून गायब झालेले सव्वा लाख तासाभरात परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:18 IST

तुमचे पेटीएम अ‍ॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांच्यावर बितला. मात्र नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तासभरात तपासाची चक्रे फिरवून तक्रारदाराचे खात्यातून कमी झालेले एक लाख २३ हजार ८०० रुपये मिळवून देण्याची कामगिरी केली.

ठळक मुद्देसायबर ग्रामीण पोलिसांचे प्रसंगावधान : सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील प्रकार; ओटीपीद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

सिन्नर : तुमचे पेटीएम अ‍ॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांच्यावर बितला. मात्र नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तासभरात तपासाची चक्रे फिरवून तक्रारदाराचे खात्यातून कमी झालेले एक लाख २३ हजार ८०० रुपये मिळवून देण्याची कामगिरी केली.त्याचे झाले असे, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय वाजे यांना फोनवरील अज्ञात व्यक्तीने तुमचे पेटीएम अ‍ॅपचे केवायसी अपडेट करावयाचे असून, त्याकरिता एक लिंक पाठवत असल्याचे सांगितले. वाजे यांच्या फोनवर एक लिंक आल्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी आला. फोनवरील अज्ञात व्यक्तीस ओटीपी दिल्यानंतर वाजे यांच्या खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये एचडीएफसी क्रेडिट कार्डवरून कमी झाल्याचा मेसेज आला.खात्यावरील सुमारे सव्वा लाख रुपये कमी झाल्याचे पाहून वाजे यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर वाजे यांनी तातडीने नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनमुलवार, कर्मचारी प्रमोद जाधव, परिक्षित निकम यांनी तक्रारदार यांची तांत्रिक माहिती घेऊन संबंधित फ्लिपकार्ड नोटल यांच्यासोबत तत्काळ संपर्क साधून फसवणूक झालेल्या रकमेचे ट्रॉन्झॅक्शन थांबविण्यास सांगितले. त्यामुळे वाजे यांची फसवणूक होऊन खात्यातून कमी झालेली सुमारे सव्वा लाख रुपयांची रक्कम त्यांचे क्रेडिट कार्ड खात्यात परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना मोठे यश मिळाले. सायबर पोलिसांच्या कामगिरीबद्दल वाजे यांनी पोलीस अधीक्षक व सायबर पोलिसांच्या पथकाचा सत्कार करून आभार मानले.अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याचीवैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नका. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बॅँक खात्याविषयी माहितीकरिता संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी. आपल्याबरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.- सुभाष अनमुलवार, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम