शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाची जाळपोळ

By admin | Updated: April 23, 2017 01:05 IST

सटाणा : देशी दारू दुकान हटविण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्याने रणरागिणींनी हल्लाबोल करून तोडफोड करत दुकान जाळून टाकले.

सटाणा : गावालगत असलेले देशी दारू दुकान हटविण्यासाठी वेळोवेळी ग्रामसभा घेऊनही प्रशासनाने दुर्लक्ष करून कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे रणरागिणींनी हल्लाबोल करून तोडफोड करत दुकान जाळून टाकले. त्यानंतर जमाव काबूत आणणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि दुकानचालक-मालकावर संतप्त महिला अक्षरश: तुटून पडल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मळगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.सटाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अडीच हजार लोकवस्ती असलेले मळगाव वसले आहे. आरम नदीकिनाऱ्यावरील या गावालगत नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे तळीरामांचा उपद्रव वाढून महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार राजरोज सुरू झाले होते. या वाढत्या प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. यामुळे ग्रामस्थांनीही पुढाकार घेऊन वेळोवेळी ग्रामसभा बोलावून दारू दुकान हटविण्याचा ठराव केला होता. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने शनिवारी सकाळी अखेर रणरागिणींच्या सहनशीलतेचा बांधच फुटला. सुमारे दीडशे ते दोनशे महिला या दुकानावर चाल करून आल्या. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संतप्त महिलांनी लाठ्याकाठ्या घेऊन दारू दुकानावरच हल्ला करत दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर एका पक्षाच्या तळीराम कार्यकर्त्याने महिलांना शिवीगाळ करत अरेरावी करून लागल्याने व दारूने भरलेल्या बाटल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केल्याने जमाव अधिकच संतप्त झाला आणि दुकानालाच आग लावून दिली. दुकानात मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याने क्षणार्धात दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. (वार्ताहर)