शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

अर्धनग्न तरुणींसह मद्यधुंदांचा धिंगाणा

By admin | Updated: March 29, 2017 01:20 IST

घोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून तेरा जणांना अटक केली आहे.

खळबळ : इगतपुरीनजीक बॅचलर पार्टीवर धाडघोटी : इगतपुरी शहरानजीक तळेगाव शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावरील एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर इगतपुरी पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकून चार युवतींसह तेरा जणांना अटक केली आहे. यात उच्चभ्रू व प्रतिष्ठित कुटुंबातील सुशिक्षित तरुणांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी मोठ्या रोख रकमेसह मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात नागपूर, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद व नंदुरबार येथील काही अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असून, त्यांना वगळल्याची चर्चा होत असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. मुंबई - आग्रा महामार्गावरील मिस्टिक व्हॅली या प्रतिष्ठित हॉटेलच्या परिसरातील बंगला क्र. ११ मध्ये काही तरुण-तरुणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकावर गोंधळ घालत असल्याची माहिती मुंबई येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने इगतपुरी पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस तेथे गेले असता बंगल्यामध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकावर मद्यधुंद अवस्थेत काही तरु णी तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करून घुंगरू बांधून नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा प्रकार थांबवून तेरा जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी ५७ हजार रु पये रोख जप्त केले. तसेच दहा रुपये मूल्याच्या ३२३ नकली नोटा, मारु ती इर्टिगा (एमएच ०२ सीआर ४३६६), लॅपटॉप, २ स्पीकर, एक अ‍ॅम्प्लिफायर, तीन ब्लॅक लेबलच्या ७५० मि.लि.च्या सीलबंद दारूच्या बाटल्या, एक अप्सुलेट वोडका बाटली असा ऐवज जप्त केला आहे. या प्रकारामुळे इगतपुरीसह जिल्ह्यात चर्चा सुरू असून, इगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश वराडे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि २९४ (अश्लीलकृत्य करणे), मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ (सार्वजनिक शांततेचा भंग) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ११ जणांना पोलीसांकडून तर वाहनचालक व साऊंड सिस्टीम चालकास न्यायालयात उभे केले असता जामीन देण्यात आला आहे.  दरम्यान, पोलिसांनी नऊ तरूण व चार तरूणींंना या प्रकरणात अटक केल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. धिंगाणा घालणाऱ्यांमध्ये काही प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांचाही समावेश असून त्यात नंदुरबार, नागपूर व औरंगाबाद येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तसेच ठाणे येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मुंबई येथे आॅनलाइन बुकींग करून व लाखो रूपये मोजून बारबाला आणल्याचेही बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात पोलीस तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला नाही. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकारी वर्गाकडून व राजकीय दबावातून काही बड्या हस्तींच्या मुलांना यातून वगळण्यात आल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. यामुळेच स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.ैअवैध व्यवसायाच्या तक्र्रारीमुंबई-ठाण्यापासून अवघ्या दीड ते दोन तासाच्या अंतरावर असलेला इगतपुरी परिसर दऱ्या-खोऱ्यांनी व निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथे मुंबईतील धनिकांनी फार्म हाऊस घेऊन ठेवलेले आहेत. याच परिसरात अनेक लहान-मोठी हॉटेल्सही आहेत. याठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असतात, अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. परंतु त्याकडे पोलीस विभागाकडून सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. लैला खानची आठवण ताजीसदरची घटना ज्या हॉटेल परिसरात घडली त्याच्याच पाठीमागील बाजूस पाच वर्षापूर्वी प्रख्यात अभिनेत्री लैला खान हिने फार्म हाऊस उभारल्याची व त्यातच तिची हत्त्या झाल्याची घटना घडली होती. बॅचलर पार्टीमुळे या हत्त्या प्रकणाचीही आठवण ताजी झाली असून, हा परिसरा व येथे उभे राहिलेले फार्म हाऊसेस पुन्हा चर्चेत आले आहेत.इगतपुरी येथे रविवारी मिस्टिक व्हॅली येथे टाकलेल्या धाडीत तेरा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यात कोणीही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची मुले नाहीत. - किशोर नवले, पोलीस निरीक्षक,  स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणपोलिसांची भूमिका संशयास्पदबॅचलर पार्टी रविवारी (दि. २६) पार पडली व त्याच रात्री कारवाई केली गेली असताना या प्रकरणाची दोन दिवस गुप्तता का पाळण्यात आली, याबाबत शंका घेतली जात आहे. स्थानिक पोलिसांपासून जिल्हास्तरीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही यासंदर्भात अधिकृतपणे माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. अंमली पदार्थ सापडल्याचीही चर्चा असून, पोलिसांकडून जप्त केलेल्या वस्तू कमी प्रमाणात दाखविल्या गेल्याची चर्चाही सुरू आहे. अटक केलेल्यांवर अंमली पदार्थ विरोधी कलम तसेच वेश्या व्यवसायाबाबतची कलमे न लावता केवळ किरकोळ कलमे लावून संशयिताना पाठीशी घालण्याचा प्रकार होत नाही ना? अशीही शंका घेण्यात येऊन पोलिसांच्या भूमिके विषयी संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांचे नातेवाईक? पार्टीत सहभागी तरुणांमध्ये केवळ नऊच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा आहे. यात नागपूर, औरंगाबाद, ठाणे व नंदुरबार येथील काही अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असल्याची चर्चा आहे.बनावट नोटापार्टीत मद्यधुंद अवस्थेत काही अर्धनग्न तरु णी अश्लील हावभाव करून घुंगरू बांधून नाचत होत्या. बड्या बापाची तरु ण पोरं त्यांच्यावर पैसे उधळत होते. विशेष म्हणजे उधळण्यात येणाऱ्या नोटांत दहा रु पयांच्या बनावट नोटाही होत्या.