नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला दिंडी काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर केला.अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार शाळेत मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीचा कार्यक्र म भक्तिमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी नानासाहेब महाले, सी. डी. शिंदे, हरिश्चंद्र मोराडे, सचिन ठोके, रावसाहेब शिंदे, योगेश निकम, विजया बच्छाव, मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पालखीचे पूजन झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.नीलिमा पवार यांनी मनोगतात अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव देण्यासंदर्भात मार्गदर्शन करून आकर्षक वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांचे कौतुक केले. अभिनव व आदर्श शिशुविहारमधील चिमुकल्यांनी रिंगण करून टाळ-मृदंगाच्या गजरात नृत्य केले. शाळेतील चिमुकल्यांनी वृक्षसंवर्धन विषयक घोषणा देत मविप्र संस्थेच्या आवारातून वृक्षदिंडी आणली. याप्रसंगी प्रतिभा बोऱ्हाडे, योती पवार आदिंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा शाळांमध्ये गजर
By admin | Updated: July 15, 2016 00:45 IST