शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगींना औषधांसाठी अलार्म करणार अलर्ट

By admin | Updated: June 23, 2017 00:24 IST

नाशिक : क्षयरोगींनी औषधे वेळच्या वेळी घ्यावीत याकरिता त्यांना अलर्ट करणारी अलार्म सिस्टम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत विकसित केली जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : क्षयरोगींनी औषधे वेळच्या वेळी घ्यावीत याकरिता त्यांना अलर्ट करणारी अलार्म सिस्टम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत विकसित केली जात असून, यापुढे क्षयरोगींवर डॉट पद्धतीद्वारे औषधोपचार एक दिवसाआडऐवजी दररोज केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील क्षयरोग उपचार केंद्रांना भेटी देत पाहणी करत काही सूचना वैद्यकीय विभागाला केल्या.केंद्र सरकारच्या क्षयरोग विभागामार्फत पथकाने दि. २१ व २२ जून रोजी शहरातील क्षयरोग उपचार केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. या पथकामध्ये आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. क्षयरोगविषयक उपचार पद्धतींची योग्यप्रकारे अंमलबजावणी होते किंवा नाही, हा या पाहणीमागचा उद्देश होता. यावेळी पथकाने वैद्यकीय विभागाला विविध सूचना केल्या. यापुढे डॉट उपचार पद्धतीअंतर्गत क्षयरोगींवर दररोज औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच खासगी डॉक्टरांनीही क्षयरोगी शोधायचे असून, त्यांना जागेवर उपचार करायचे आहेत. त्याबाबतचे रिपोर्टिंगही त्यांनी महापालिकेकडे करायचे आहे. त्यासाठी औषधे शासन विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. गरज भासल्यास क्षयरोगींवर मनपाच्या रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयातही पुढील उपचार केले जाणार आहेत. क्षयरोगींच्या उपचारपद्धतीबाबत जागृती करण्यात यावी. त्यात खंड पाडता कामा नये. ज्यांना क्षयरोगाची लागण झाली आहे त्यांना उपचाराखाली आणावे, आदी सूचना देण्यात आल्या. दरम्यान, पाहणी पथकाने कथडा रुग्णालयात क्षयरोगाचे निदान होण्यासाठी बसविलेल्या सीबीनेट मशीनचीही पाहणी केली. यावेळी टीसीएसमार्फत क्षयरोगींना औषधे घेण्यासाठी अलर्ट करणारी अलार्म सिस्टम विकसित केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली. पथकाने या संशोधनाची प्रशंसा केली.