शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयकुमार देणार झेडपी सदस्यांना हगणदारीमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:25 IST

‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ : २४ आॅगस्टचा मुहूर्त नाशिक : नाशिक जिल्हा २६ जानेवारी २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा विडा उचललेल्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना अभिनेता अक्षयकुमारचा नुकताच रिलिज झालेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ सिनेमा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.

‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ : २४ आॅगस्टचा मुहूर्तनाशिक : नाशिक जिल्हा २६ जानेवारी २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा विडा उचललेल्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने येत्या २४ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना अभिनेता अक्षयकुमारचा नुकताच रिलिज झालेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ सिनेमा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत दूरध्वनीने याची कल्पना देण्यात आली आहे. २४ आॅगस्टला दुपारी एक वाजेच्या सिनेमॅक्समध्ये या शोचे लोकप्रतिनिधींसाठी आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तीन तालुके शंभर टक्के हगणदारीमुक्त झाल्याचा दावा करणाºया संबंधित विभागाने संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त होण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शौचालय उभारण्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे प्रयोजन स्वच्छता विभागाने केले आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ राजस्थानमधील एका खेडेगावातील युवक-युवतीची प्रेमकथा असून, अक्षयकुमार याचे अभिनेत्रीवरील व त्यापोटी अभिनेत्रीने शौचालय उभारणीसाठी अक्षयकुमारसह ग्रामस्थांना कसे उद्युक्त केले? याची माहिती चित्रपटात आहे. हा सिनेमा स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत तो लोकप्रतिनिधींना दाखविला तर शौचालय उभारणीसाठी अधिक चांगल्या प्रकारे जनजागृती होऊ शकते, असे गृहीत धरून येत्या २४ आॅगस्टला नाशिक जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सर्व ७३ सदस्यांना हा सिनेमा दाखविण्यात येणार असल्याचे समजते. अर्थात सिनेमा दाखविण्यासाठीचा खर्च स्वच्छता विभागाच्या प्रचार व प्रसार खात्यात टाकण्यात येण्याची शक्यता आहे.