शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:40 IST

नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । त्यांच्या घरातच तळपते तलवार; १६ पुरस्कार फक्त तलवारबाजीचे; नाशिकला ५६ पुरस्कार

’संदीप भालेराव।नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे.अशोक दुधारे यांनी तलवारबाजी खेळ रुजविला. शाळेतील मुलांना शिकवितांनाच यांनी मुलगा अजिंक्य व मुलगी अस्मिता यांनाही तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले. त्यांना २००१ मध्ये क्रीडा कार्यकर्ता व २००९ मध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारांने सन्मानित केले आहे. अजिंक्यने राष्टÑीय स्पर्धांत २१ सुवर्ण, राज्य स्पर्धांत ७० सुवर्ण पदके मिळवून तीनदा जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याला २००९-१० मध्ये शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कुटुंबातच तलवार तळपली : महाराष्टÑात तलवारबाजी खेळ रूजविण्यासाठी गेल्या २० वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर कुठे या खेळाला ओळख मिळू लागली आहे. आमच्या कुटुबीयांचा सहभाग असल्याने निश्चितच समाधान आहे. कुटुंबातच तलवार तळपल्याने दुधारे म्हटले की तलवारबाजी असे जणू समीकरणच असे लोक मानतात. याचा अभिमान वाटतो. छत्रपतींच्या नावाने खेळातील हा सर्वोेच्च सन्मान कुटूंबात असणे गौरवाची बाब आहे.- अशोक दुधारे, प्रशिक्षक, नाशिक (दोनदा छत्रपती पुरस्कार विजेते )मुलगी आणि सुनबाईही जोरातअशोक दुधारे यांच्या सुनबाई, अजिंक्य यांची पत्नी कोमलप्रीत पंजाबची तलवारबाज असून, तिने राष्टÑीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, ३१ रौप्य आणि १६ कांस्य पदके; पटकावली. तिला ३५ आंतरराष्टÑीय स्पर्धांचा अनुभव आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर दोन सुवर्ण तिने पटकाविली आहेत. मुलगी अस्मिताला २०१४/१५ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. तिने राष्टÑीय स्पर्धेत ३ सुवर्ण, राज्य स्पर्धांमध्ये ३१ सुवर्णपदके कमाविली आहेत. दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचाही तिला अनुभव आहे.