शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या पर्वणीसाठी आखाडे, प्रशासन सज्ज

By admin | Updated: September 23, 2015 23:07 IST

विक्रमी गर्दी होण्याची शक्यता : पहिल्या पर्वणीप्रमाणे असणार क्रम

त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्यातील पहिली अन् दुसरी पर्वणी उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता आखाडे, प्रशासन आणि भाविकांना तिसऱ्या पर्वणीचे वेध लागले आहेत. आखाडे व प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, पहिल्या पर्वणीतील क्रमानुसारच शाहीस्नान विधिवत, सवाद्य मिरवणुकीने पार पडणार आहे.जुना आखाडा पहाटे ३.४० मिनिटांनी पिंपळद येथील आखाड्यातून निघणार असून, जव्हारफाटा-खंडेराव मंदिर-तेलीगल्ली या मार्गे ४.१५ पर्यंत कुशावर्तावर आखाड्याची आद्यदेवता दत्त भगवान आणि निषाण, शस्त्र, भाले यांचे पूजन, स्नान झाल्यानंतर आखाड्यातील नागा साधू, साधू-महंत व भाविक स्नान करून ५ वाजता शाही मार्गाने त्र्यंबकेश्वर मंदिरात जातील. तेथील दर्शन आटोपून वाजतगाजत ही मंडळी पहाटे ६ वाजेपर्यंत आपल्या आखाड्यात परतणार आहेत. याच आखाड्याबरोबर खंडेराव महाराज मंदिर येथे आवाहन आणि अग्नी आखाडा येणार असून, त्यांचेही स्नान ठरलेल्या वेळांनुसार होईल. अग्नी आखाडा ६.१५ पर्यंत आपल्या आखाड्यात परतेल. त्यानंतर ४.२० ते १२ वाजेपर्यंत निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी, अटल, बडा उदासीन, नवा उदासीन व निर्मल हे आखाडे सवाद्य मिरवणुकीसह कुशावर्तावर येतील व स्नान करून शाही मार्गाने त्र्यंबकराजाचे दर्शन करून आपापल्या आखाड्यांत परत जातील. साधू-संत-महंत व त्यांचे भाविक यांना शांततेने व विधिवत स्नान करताना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. आखाडे, ग्रामस्थ आणि भाविकांच्या मागणीनुसार कुशावर्त चौक ते त्र्यंबकेश्वर मंदिर या शाही मार्गावर मध्यभागी बॅरिकेड्समध्ये भाविकांना थांबू दिले जाणार असून, ग्रामस्थ व देशभरातून आलेल्या भाविकांना कुंभमेळ्यातील शाहीस्नानांचा, मिरवणुकांचा आस्वाद घेऊ दिला जाणार आहे.दुपारी १२ वाजेनंतरच भाविकांना कुशावर्त तीर्थ खुले करून देण्यात येणार असून, तोपर्यंत कुणीही स्नानाला जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तिसऱ्या पर्वणीसाठी चार लाख भाविक येण्याचा अंदाज गृहीत धरून त्यानुसार परिवहन महामंडळ, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, विद्युत महामंडळ आदिंनी नियोजन आराखडा तयार केला आहे. पहिल्या पर्वणीतील भाविकांचा अल्प प्रतिसाद व इतर प्रशासकीय त्रुटी दूर करीत यशस्वी झालेल्या दुसऱ्या पर्वणीप्रमाणेच तिसरी पर्वणीही सर्वाधिक यशस्वी पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सर्व पातळीवर सज्जता झाली आहे.या पर्वणीतही पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक कार्यकर्ते, जीवरक्षक दल, आरोग्य यंत्रणा, नगरपरिषद टीम, पुरोहित संघ आणि ग्रामस्थ परिश्रम घेणार आहेत. (वार्ताहर)