वडनेर : मालेगाव तालुक्यातील विराणे येथे बोरी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने अजंग येथील दोन सख्ख्या भावांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अजंग येथील लग्नाचे वऱ्हाड निमशेवडी येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून परततांना अजंग येथील हर्षल देवीदास जाधव, रितेश देवीदास जाधव व चुलतभाऊ भावेश भगवान जाधव हे बोरी धरणावर गेले होते. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हर्षल जाधव (२२) व रितेश जाधव (१८) या दोघांचा सेल्फी काढताना पाण्यात बुडून मृत्यू झालाn दोन्ही चुलत भाऊ बुडाल्याचे पाहून भावेश घटनास्थळीच बेशुद्ध पडला. रात्री उशिरा वडेल येथे दोघांवर अंत्यविधी करण्यात आला. हर्षल हा इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षात तर रितेश बारावी शिकत होता. त्यांचे वडील देविदास जाधव हे येवला येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक आहेत. एकाचवेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे..
बाेरी धरणात सेल्फी काढताना अजंगच्या दोन भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:49 IST