शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

अजंगला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: June 12, 2014 00:46 IST

मालेगाव : शहर तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले.

मालेगाव : शहर तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे गावोगावचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिंकाणी घरांचे तसेच काही शाळांचे पत्रे उडाले. कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या. येथील महसूल प्रशासनातर्फे सकाळपासून संपूर्ण तालुक्यात या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. वडेल : परिसरात गेल्या अनेक वर्षात झाला नसेल अशा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येथील नामदेव वाघ यांच्या घराचे संपूर्ण पत्रेच उडून गेले आहे. दिलीप चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने पत्र्यावर ठेवलेले दगड अंगावर पडून नाना चव्हाण हे गंभीर जखमी झाले. सुरेखा चव्हाण व सोनाली चव्हाणही जखमी झाल्या. भाऊसाहेब बोरसे यांच्या पायावर दगड पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. सरपंच अनिल बच्छाव यांच्या मातोश्री चंद्रभागा बच्छाव यांच्या अंगावर मळ्यातील राहत्या घराची भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजंग परिसरातील रावळगाव रस्त्यावरील इंदिरानगर भागातील रहिवासी कलाबाई कांतीलाल ठाकूर यांच्या घराचे पूर्ण छत उडालेले आहे. रामलाल सोनवणे या शेतमजुराच्या घरावर निंबाचे झाड कोसळून त्याचे पूर्ण घर उद्ध्वस्त झाले त्यांचा संपूर्ण संसारच उघड्यावर पडला आहे. डी. डब्ल्यू. पाटील या पोल्ट्री व्यावसायिकाचे पत्रे उडून पक्षी मृत्युमुखी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. अजंग येथील संतोष भाऊ पेट्रोलपंपाचे डिझेल व पेट्रोलचे दोन्ही मशीन जमीनदोस्त झाले. अजंग प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. तेथे तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. इंदिरानगर भागातील ठक्करबाप्पा सभागृहाचेही पत्रे उडाले. अजंग बसस्थानकालगतचे निंबाचे झाड कोसळल्याने त्याखालील सर्व दुचाकी या दाबल्या गेल्या. गाव परिसरात या मृग नक्षत्राच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. पेरणीपूर्व मशागतीत गुंतलेला शेतमजूर व शेतकरी हा पेरणीसाठीची तजवीजही घर दुरुस्तीत खर्च होईल की काय या चिंतेत बुडाला आहे. चिंचावडला वीजपुरवठा खंडितचिंचावड : परिसरात वादळी पावसाच्या तडाख्याने घरांचे नुकसान झाले. तसेच गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. चक्री वादळासह आलेल्या या पावसाने कौतिक काशिराम गांगुर्डे यांच्या पत्र्याच्या घराचे संपूर्ण नुकसान झाले. घरांच्या भिंती, घरातील गृहोपयोगी वस्तू तसेच गहू, बाजरी व धान्याचे संपूर्ण नुकसान झाले. कडू येता गुटले यांच्याही घराचे पत्रे उडून घरातील गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुंदरबाई कडू गुटले या महिलेच्या डोळ्याला पत्रा लागून त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. फुला उखा निकम यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडाले. रघुनाथ काशिराम गांगुर्डे, कारभारी भिका बच्छाव, अर्चना प्रभाकर पवार, भगवान त्र्यंबक भामरे, दगा बापू भामरे, संजय त्र्यंबक भामरे, पुंडलिक शिवाजी देवरे, संभाजी शिवाजी देवरे, ज्ञानेश्वर शिवाजी देवरे, काशीनाथ पवार, तुकाराम पवार, भिका पवार, मुरलीधर नामदेव पवार आदि शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान झाले. चिंचावड ते सौंदाणा व चिंचावड ते डोंगरगाव रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली. परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. गावातील काही गल्ल्यांमध्ये काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे वीज मंडळाचे कर्मचारी एस. एल. गोसावी यांनी सांगितले. नुकसानीचा शासनाने पंचनामा करुन तत्काळ मदत द्यावी अशी मागणी सरपंच बापू बोरसे, मन्साराम जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, बंडू गुंजाळ आदिंनी केली आहे. (वार्ताहर)