शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

हवाई प्रयोगाचा ड्रोन जमिनीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST

नाशिक : करायचे तर काही तरी हटकेच. मग रस्त्यावर पडलेल्या व उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या खड्ड्यांचे उपग्रहाद्वारे मोजमाप असो की, ...

नाशिक : करायचे तर काही तरी हटकेच. मग रस्त्यावर पडलेल्या व उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या खड्ड्यांचे उपग्रहाद्वारे मोजमाप असो की, अदृश्य स्वरूपात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर हवाईमार्गे हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी असो. आता हवाईमार्गे औषध फवारणी म्हटल्यावर आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर किंवा विमान डोळ्यापुढे आल्याशिवाय राहणार नाही. परंतु, नाशकातील गल्लीबोळात औषधाचा शिडकावा करण्यासाठी हवाई आयुधे उपयोगी पडणार नसल्याचे पाहून खासदार हेमंत गोडसे यांनी ड्रोनद्वारे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन त्याचा वाजतगाजत शुभारंभही केला. शहरातील सर्वच गल्लीबोळांतून थैमान घालणाऱ्या विषाणूचा आता नायनाट होणारच, या आनंदात समस्त गुलशनाबादकर लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असतानाही नाचले. थेट परराज्यातील तंत्रज्ञांकडून कोरोना विषाणूचा बंदोबस्त करण्यासाठी गोडसे यांनी मागवलेल्या नवीन फार्म्युल्याचे नुसते कौतुकच झाले नाही तर गेल्या वर्षभरापासून कोरोना रूग्णांची न थकता सेवा करणाऱ्या समस्त डॉक्टर, परिचारिकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. मंत्री, सचिवांच्या बैठकांमध्ये तासनतास बसून राहणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोमन गोडसे यांचे आभार मानले. कोरोनावर मात करण्यासाठी जालीम अशाप्रकारचा नवीन फॉर्म्युला आजवर आपल्याला कसा सुचला नाही, म्हणून गोडसे यांच्या स्वपक्षातील तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांनाही प्रश्न पडला. शहरी भागातच कोरोनावर जालीम उपाय करायचा आणि ग्रामीण भागाला खुदाच्या भरोसे सोडून देण्याच्या गोडसे यांच्या पक्षपातीपणाबद्दल सिन्नर, इगतपुरीच्या मतदारांमधून काहीशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. परंतु, दोनवेळा मतदारांनी लोकसभेत पाठविल्यामुळे कायमच ‘हवेतील प्रयोगा’वर विश्वास ठेवून असलेल्या गोडसे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण भागापेक्षा नाशिककरांना कोरोनापासून मुक्ती देण्याचा चंग बांधून त्यांनी उडवलेला ड्रोन मात्र अवघ्या काही मिनिटातच जमिनीवर आला. गोडसे यांचे स्वप्न भंग झाले तसेच समस्त गुलशनाबादकरही हळहळले. तांत्रिक कारणामुळे हवाईमार्गे नाशिकरांना कोरोनामुक्त करण्याचा प्रयोग आधुनिक सामग्री व विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शक घेऊनही अयशस्वी ठरल्याने जमिनीवर आलेल्या गोडसे यांनी आता ग्रामीण भागातील ट्रॅक्टरचा आधार घेतला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने यापुढे शहरात औषध फवारणी करण्याचा त्यांनी नुसता मनसुबाच व्यक्त केला नाही तर त्याचाही वाजतगाजत शुभारंभ केला. त्यात आता फरक इतकाच की, जसे उपग्रहाद्वारे रस्त्यावरचे खड्डे मोजल्यानंतर त्याचे पुढे काय झाले, हे जसे समजू शकले नाही, तसेच हवाई असो वा जमिनीवरून करण्यात येत असलेल्या औषध फवारणीतून काय निष्पन्न झाले, याबाबत मात्र गोडसे यांना दोषी धरू नये.