नाशिकरोड : देशाच्या एअरमॅपवर ओझर विमानतळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.दिल्ली येथे केंद्रीय उड्डयन मंत्री गजपती राजू व डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हीएशन सत्यवती यांची खासदार गोडसे यांनी भेट घेऊन जी नवीन विमानतळे आहेत, त्यांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सवलती द्याव्या. तसेच नवीन विमानतळ अखंड सुरू राहण्यासाठी मदत करून त्या ठिकाणी हॉल्ंिटग फ्लाईटसाठी एअर कंपन्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी गोडसे यांनी केली. याशिवाय नाशिक ओझर विमानतळाचा भारताच्या एअरमॅपमध्ये समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली. नाशिक ओझर विमानतळ अॅरोनॉटिक इन्फर्मेशन पब्लिकेशनची मान्यता घेऊन एअरपोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडियामार्फत १५ दिवसांच्या आत अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय उड्डयन मंत्री गजपती राजू यांनी दिल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
देशाच्या एअर मॅपवर ओझर विमानतळ असावे
By admin | Updated: October 11, 2015 21:51 IST