शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया विमानसेवेसाठी उत्सुक

By admin | Updated: February 28, 2016 23:52 IST

नवा प्रस्ताव : पुन्हा मार्चचा मुहूर्त

ओझर टाउनशिप : नाशिकला हवाईसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी तयारी दर्शविली असली तरी प्रत्यक्षात नाशिकच्या विमानसेवेला मुहूर्त काही सापडत नसल्याचे चित्र आहे. आता मात्र एअर इंडियानेच मार्चपासून नाशिक व हुबळी ही शहरे मुंबईला जोडण्याचे उद्दिष्ट त्यांच्या वर्षपूर्तीच्या पुस्तिकेत छापल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या हवाईसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.एअर इंडियाचे प्रबंध निर्देशक तथा अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियातर्फे वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या वार्षिक पुस्तिकेतच याबाबतचे सूतोवाच केले आहे. या पुस्तिकेत एअर इंडियाच्या भावी वाटचालीसंदर्भात आवश्यक ते नियोजन व त्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाते. एअर इंडियाच्या ‘कनेक्टिंग इंडिया’ या उपक्रमांतर्गत देशातील दुसऱ्या क्रमांकाची शहरे जोडण्याचे उद्दिष्ट चालू वर्षी ठेवले आहे. त्या अंतर्गत मुंबई ते सुरत, ग्वालिअर-दुर्गापूर ते दिल्ली ही विमानसेवा सुरू केली असून, जानेवारीत गोरखपूर ते दिल्ली हवाईसेवा सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर मार्चपासून नाशिक ते मुंबई व हुबळी ते मुंबई, विजयवाडा ते बेंगळुरू, तसेच सायंकालीन हवाईसेवेच्या माध्यमातून भोपाळ ते मुंबई ही सेवा सुरू करण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच दिल्ली ते देहराडून आणि दिल्ली ते अलाहाबाद यांच्या दरम्यान जास्तीत जास्त विमान फेऱ्या मारण्याचे यावर्षीचे एअर इंडियाचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी त्यांच्या वार्षिक पुस्तिकेत नमूद केले आहे. यासंदर्भातील माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कळविली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून नाशिकच्या विमानसेवेचा मुहूर्त कदाचित पुढच्याच महिन्यात होण्याची सुचिन्हे आहेत. (प्रतिनिधी)