शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एअर डेक्कनची सप्टेंबर अखेर विमानसेवा

By admin | Updated: July 10, 2017 01:28 IST

नाशिक : विमानसेवेबाबत चर्चा होऊन त्यात नाशिकची विमानसेवा येत्या सप्टेंबर अखेरपासून सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिल्ली येथे विंग २०१७ या ‘उडो सब जुडो’ चर्चेत उडान योजनेंतर्गत सुरू करावयाच्या विमानसेवेबाबत चर्चा होऊन त्यात नाशिकची विमानसेवा येत्या सप्टेंबर अखेरपासून सुरू करण्याचे आश्वासन एअर डेक्कन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राजू व जयंत सिन्हा यांच्या हस्ते या विंग २०१७ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सिव्हिल एव्हिएशनचे प्रधान सचिव चोभे, एअरपोर्ट अ‍ॅथोरेटी आॅफ इंडियाचे मनोज खुल्लर तसेच सर्व केंद्रीय अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक राज्याने उडान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी काय सवलती दिल्या जातील, याची माहिती दिली. महाराष्ट्र सिव्हिल एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर यांनी महाराष्ट्र शासनाने काय सवलती देणार असल्याचे सांगितले. या चर्चासत्रात एअर एशिया इंडिया लि., टाटा सीआ एअरलाइन्स लि., स्टार एअर घोडावत एंटरप्राइजेस प्रा. लि, टूरजेट, जेट एअरवेज इंडिया लि; स्पाइसजेट लि; झेक्सस एअर सर्व्हिसेस प्रा. लि., डेक्कन चार्ट्स प्रा. लि., महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि., इंडिगो आणि एअर लाइन एलाइड सर्व्हिसेस लि. या दहा एअरलाइन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कार्यशाळेच्या दुसऱ्या चर्चासत्रात सिव्हिल एव्हिएशन अधिकाऱ्यांसमवेत सिव्हिल एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर, यू. पी. ककाणे, खासदार हेमंत गोडसे यांनी एअर इंडिया तसेच एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांशी नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली.