शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

4.50 कोटींसाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर टाच

By admin | Updated: April 28, 2016 00:15 IST

ठेवी प्रकरण :१७ जून रोजी होणार लिला

नािशक : महापालिका शिक्षण मंडळाच्या साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी न मिळाल्याने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या बोहरपट्टी येथील कार्यालयावर टाच आणण्यात आली असून, शिक्षण मंडळाने ही मिळकत लिलावात काढली आहे. त्यानुसार १६ जून रोजी लिलाव होणार आहे. अर्थात, महापालिकेची केवळ मुद्दल रक्कम वसूल होऊ शकेल; परंतु व्याजासह हीच रक्कम बारा कोटींच्या घरात असून उर्वरित रक्कम कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिक महापालिकेच्या विविध सहकारी बॅँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी वसूल न झाल्याने अडचण निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ठेवी पालिकेला मिळालेल्या नाहीत, शिवाय महापालिका शिक्षण मंडळाच्या देखील साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी अशाच प्रकारे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत अडकल्या आहेत. त्यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. महापालिकेची ४ कोटी ५७ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम थकली असून, व्याजासहीत ही रक्कम कैकपटीने अधिक आहे. महापालिकेच्या दाव्याच्या अनुषंगाने गहाण ठेवलेली ही रक्कम वसूल करण्यासाठी १६ जून रोजी लिलाव काढण्यात येणार असून, तशी नोटीसच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता १६ जून रोजी ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. महापालिकेने लिलाव करून वसुलीची तयारी सुरू केली असली तरी केवळ साडेचार कोटी रुपयांचाच विचार केला आहे, असे पालिकेतील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या पतसंस्थेकडे व्याजासह सुमारे साडेबारा कोटी रुपयांची देणी वसूल करणे बाकी असून, त्या पार्श्वभूमीवर केवळ एकाच कार्यालयाच्या लिलावातून ही रक्कम कशी काय वसूल होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.