शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:54 IST

राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.

ठळक मुद्देदादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यात साधला संवाद

नाशिक : राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.खुद्द कृषीमंत्री आपल्या बांधावर अवतरल्याने शेतकºयांनीही आनंद व्यक्त करीत आपले मन मोकळे केले. यावेळी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कृषीमंत्री भुसे यांनी दिले.राज्यातील शेतकºयांच्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढी बरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातुन एक दिवस कृषीमंत्री शेतकºयांच्या बांधावर या उपक्रमांतर्गत भुसे यांनी गुरुवारी (दि.१३) वळवाडे येथे भेट दिली. यावेळी भुसे यांनी शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन निर्यातक्षम उत्पादन घेण्याचे आवाहन केले. शेतकरी गवळी यांच्याशी चर्चा करताना कृषी विभागातील अधिकारी शेतात येतात का, याची त्यांनी विचारणा केली. दरम्यान, शेतकºयांनी पीक विमा योजनेची मागणी केली. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातीलच वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल, सावतावाडी, झोडगे, पळासदरे व सायने या गावांना भेटी देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला.कांदा निर्यातबंदी उठविण्याचे प्रयत्नकांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी केंद्राकडे राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. याशिवाय पीक विमा कंपन्यांची बैठक घेतली. येत्या पंधरा दिवसात शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्हा आणि विभागवार आढावा बैठका घेत असल्याची माहिती यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी दिली. कृषी विभागाच्या अधिकाºयांना शेतकºयांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती