महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. कृषीकन्यांनी फुलकोबी आच्छादान या विषयी माहिती व प्रात्यक्षिक शेतकºयांना दिले. आच्छादनासाठी वापरण्यात येणाºया पध्दती शेतकºयांना समाजावून सांगण्यात आल्या. त्यासोबतच गुट्टी कलम याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी सायली गिते, हर्षदा सानप, दीप्ती थेटे, भाग्यशाला शिरसाट, मयूरी होले, पूनम काळे या कृषीकन्यांनी शेतकºयांना माहिती दिली. या कृषीकन्यांना प्राचार्य डॉ. अरविंद हारदे, प्रा. सुरेखा घुले, ए. वाय. सहाणे, अर्जुन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषीकन्यांकडून शेतीविषयक प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:37 IST