शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी नगरसेवकांच्या प्रभागाला बसला धक्का

By admin | Updated: October 8, 2016 01:34 IST

आजी-माजी नगरसेवकांच्या प्रभागाला बसला धक्का

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोकामगारवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको प्रभागात नव्या रचनेनुसार दोन नगरसेवकांची संख्या वाढली आहे. या प्रभागांमध्ये काही विद्यमान नगरसेवकांबरोबरच माजी नगरसेवकांना त्यांच्या मूळ प्रभागातून निवडणूक लढविता येणार नसल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागात जावे लागणार आहे. सिडकोतील एकूण सहा प्रभाग झाले असून, यात जुना प्रभाग क्रमांक ४४ हा तुटला आहे, तर नव्या प्रभागातही दुसऱ्या प्रभागातील प्रभागांचा समावेश झाल्याने आजी-माजी नगरसेवकांना अडचणींचा ठरणार आहे. सिडको प्रभाग - २४ : नव्या रचनेनुसार प्रभाग २४ मध्ये सध्याच्या प्रभाग ४१ व ४२ चा संपूर्ण भाग आला असून, आजूबाजूचा काही परिसराचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग २४ (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, २४ (ब) - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, २४ (क) - सर्वसाधारण महिला, २४ (ड) - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंभळे, राजेंद्र महाले, कल्पना पांडे व अश्विनी बोरस्ते यांना या प्रभागातून निवडणूक लढविण्याची संधी आहे. सिडको - प्रभाग २५ : प्रभाग २५ मध्ये सध्याचा प्रभाग ४७ व ४८सह प्रभाग ४१ चा व ४६ चा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या प्रभागाची रचना करताना यात चार प्रभागांचा म्हणजेच आठ नगरसेवकांचा समावेश असलेला प्रभाग आहे. प्रभाग २५ (अ) - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, २५ (ब) - सर्वसाधारण महिला, २५ (क) - सर्वसाधारण महिला, २५ (ड) - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, डॉ. अपूर्व हिरे, अनिल मटाले, राजेंद्र महाले, हर्षा बडगुजर, कांचन पाटील, अश्विनी बोरस्ते, शोभा निकम आदिंचा प्रभागाचा भाग थोड्या अधिक प्रमाणात समाविष्ट झाला आहे.प्रभाग २६ : प्रभाग २६ मध्ये सध्याचा प्रभाग ४९ व ५० चा भागाचा समावेश करण्यात आला आहे. सध्याचा प्रभाग ५० हा सातपूर प्रभागात असून, नवीन रचनेनुसार प्रभाग ५० हा सिडको प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, सचिन भोर, सुवर्णा मटाले, नंदिनी जाधव यांना या ठिकाणाहून उमेदवारी करण्याची संधी आहे. प्रभाग - २७ : या प्रभागात दोन जागा राखीव झाल्या असून, एक नागरिक मागासवर्ग महिला व एक सर्वसाधारण महिलांसाठी सोडण्यात आला आहे. यामुळे सध्याचा प्रभाग ४४ चे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांना मात्र या प्रभागातून उमेदवारी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले, परंतु जायभावे यांना प्रभाग २९ मधून उमेदवारी करण्याची संधी दिसत आहे, तर विद्यमान नगरसेवक शीतल भामरे या महिला असल्याने त्यांना नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग २७, २८ व २९ या तीनही प्रभागात निवडणूक लढविण्याची संधी आहे. प्रभाग - २८ : प्रभाग २८ मध्ये सध्याचा मूळ प्रभाग ४९ व ४५ च्या भागासह प्रभाग ४८ व प्रभाग ४४ च्या काही भागांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, लक्ष्मण जायभावे, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, रत्नमाला राणे, तानाजी जायभावे आदि नगरसेवकांचा भागाचा समावेश आहे, परंतु यातील काही विद्यमान नगरसेवक हे दुसऱ्या भागातून उमेदवारी करणार असल्याचे समजते.प्रभाग - २९ : नव्या रचनेनुसार प्रभाग २९ मध्ये सध्याचे मूळ प्रभाग ४३, ४४, ४५, ४६ आदिंचा थोड्या-अधिक भागांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागाचे आरक्षणामध्ये प्रभाग २९ (अ)- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, २९ (ब)- सर्वसाधारण महिला, २९ (क)- सर्वसाधारण, २९ (ड) - सर्वसाधारण असे आहे. यामुळे या प्रभागातून अनेकांना निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग ४४ चे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांना त्यांचा सध्याचा प्रभाग ४४ हा महिलांसाठी राखीव झाल्याने प्रभाग २९ मधून उमेदवारीसाठी संधी आहे. याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, अ‍ॅड. अरविंद शेळके, शिवाजी चुंभळे, रत्नमाला राणे, माजीनगरसेवक सुमन सोनवणे, सतीश खैरनार तसेच मुकेश शहाणे, देवा वाघमारे, रमेश उघडे, विष्णू पवार, भागवत आदिंनाही या ठिकाणाहून उमेदवारी करण्याची संधी आहे.