शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन आक्रमक : मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:17 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने पंढपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणे आपल्या हातात नसल्याचे सांगत त्यांनी काकासाहेब शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने पंढपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणे आपल्या हातात नसल्याचे सांगत त्यांनी काकासाहेब शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या मागणीसोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (दि.२४) मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी २ वाजेच्या सुमारास रास्ता रोको करून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.  मराठा क्रांती मोर्चातर्फे वरदलक्ष्मी मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा बंद आंदोलनाची नियोजन बैठक झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नांदूरनाकामार्गे मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल जत्रापर्यंत मोर्चा काढून तेथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’आदी घोषणा करतानाच राज्य व क्रेंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकरी आंदोलनातील व दूधदराच्या आंदोलनात सहभागी तरुणांवर सराकारने खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.स्कूलबस, रुग्णवाहिकांना मार्गमराठा आंदोलक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेले असतानाही मराठा क्रांती मूक मोर्चात समाजाने आंदोलनात दाखवून दिलेला आदर्श मंगळवारच्या आंदोलनातही दिसून आला. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्कूलबस, रुग्णवाहिकांना तत्काळ मोकळी वाट करून दिली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा